माझ्या चाहत्यांना ‘किडनॅप’ नक्कीच आवडेल - संजय दत्त
|
‘किडनॅप’ चित्रपटात काम करण्याच्यामागची भूमिका काय?
संजय गढवी यांनी चित्रपटाची पहिली लाइन ऐकवली तेव्हाच यामध्ये काम करण्याचे मी निश्चित केले. कित्येक वर्षात मी अशी भूमिका केलेली नाही. ही भूमिका माझ्या जीवनाशी मिळतीजुळती वाटली. आपल्या लाडक्या मुलीच्या सुरक्षिततेसाठी तिचा बाप कोणत्याही थराला जाऊ शकतो, ही भूमिका खरोखरीच आपणहून करावीशी वाटली.
दिग्दर्शक म्हणून संजय गढवी कसे वाटले?
उत्तमच. त्यांच्या मनातील संकल्पना स्पष्ट असतात. आपल्याला काय हवे आहे हे माहीत असल्याने ते कलाकाराकडून उत्तम अभिनय काढून घेऊ शकतात.
'किडनॅप' च्या बाबतीत थोडे सांगशील
शूटिंगवेळी निर्माता, दिग्दर्शक आणि सहका-यांना माझ्यामुळे खूप त्रास झाला. तरीदेखील माझ्या आवडती भूमिका करायला मिळाली म्हणून मी खूश आहे. 2008 मध्ये प्रदर्शित होणारा हा माझा पहिला चित्रपट आहे. हा थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट माझ्या चाहत्यांना नक्कीच आवडेल असा मला विश्वास आहे.
वडिलांची भूमिका करताना समस्या आली?
अजिबात नाही. याच्यापूर्वीही मी ऋतिक रोशनच्या वडिलांची भूमिका केली आहे. 'किडनॅप' मधील भूमिका आपल्या जवळची असल्याचे यापूर्वीच सांगितले होतेस. विक्रांतची भूमिका तुझ्या जीवनाशी
कशी मिळती जुळती आहे?
या चित्रपटात मी वडिलांची भूमिका केली आहे. माझी मुलगी त्रिशालावर मी खूप प्रेम करतो. तिचे अपहरण झाले तर तर माझी मनस्थिती काय असेल याची मी चित्रपटापूर्वी विचार करीत असे. त्यामुळे तुम्हाला चित्रपटात माझ्या अभिनयापेक्षा नैसर्गिक भावना अधिक दिसतील.
दर्शकांना 'किडनॅप' का आवडेल असे वाटते?
माझे वैयक्तिक मत विचाराल तर 'किडनॅप' या चित्रपट थ्रिलर आहेच शिवाय यामध्ये भाव भावनांता हात घालण्यात आला आहे. यामध्ये बाप-लेक, पती-पत्नी, मुलगा-मुलगी अशा नात्यांतील ओलावा दाखविण्यात आला आहे.
नवखा कलाकार म्हणून इमरानबरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता?
तो हुशार व मेहनती युवक आहे. तो लवकरच यश मिळवेल.
तुझे अगामी चित्रपट कोणते आहेत?
ईएमआई, अलाद्दीन, ब्लू आणि मुन्नाभाई 3 मध्ये मी काम करीत आहेत.
जीवनातील कोणती बाब तुला सर्वात जास्त आनंददायक आहे?
मी एका महान आई-वडिलांचा मुलगा आहे आणि माझ्याकडे चांगले मित्र, हितचिंतक आहेत, हीच माझ्यादृष्टीने आनंदाची बाब आहे.
आणि कोणत्या गोष्टींचे दुख:?
जेव्हा मी ड्रग्ज घेत होतो ते दिवस आणि कारागृहातील दिवस.
