हिंदू-मुस्लिम दरी राजकारण्यांमुळेच - सलमान
|
माफ करा 'हीरोज़' जा हिरो मी नसून सोहेल खान आहे.
|
खरेतर मीपण प्रिमियर मिस केले. मी लंडनमध्ये 'लंडन ड्रीम्स' च्या शूटिंगमध्ये व्यस्त होतो.
सध्या अमिताभ बच्चन आजारी आहेत. तू त्यांना काय संदेश देशील?
ते बॉलीवूडमधील ज्येष्ठ व महान कलाकारांपैकी एक आहेत. त्यांची प्रकृती खराब असल्याने याचा परिणाम निश्चितच सगळ्या इंडस्ट्रीवर होणार आहे. मलाही त्यांची चिंता लागून राहिली आहे. ते फायटर आहेत म्हणून या आजाराशी मुकाबला करून ते लवकरच बरे होतील, असा मला विश्वास आहे.
|
'हीरोज़' भारतीय सैनिक अथवा पाकिस्तानाच्या विरोधात नाही. ही दोन युवकांची कहाणी आहे. आर्मीमध्ये भर्ती होणे महत्त्वपूर्ण आहे की नाही, याची त्यांना माहिती नसते. चित्रपटात जवानच्या भूमिकेत माझ्यासह सनी, बॉबी, डीनो आहेत.
|
जर तुम्ही दूस-यांच्या धर्म आणि संस्कृतीचा आदर कराल तर ते देखील तुमच्या धर्म आणि संस्कृतीचा आदर करतील. सर्वधर्म समान आहेत, असे मी मानतो. सर्वांचे रस्ते वेगळे असले तरी शिकवण एकच आहे. मला हिंदू-मुस्लिम वाद लक्षातच येत नाही. हिंदू-मुस्लिम समाजातील लोक एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्यात वाद निर्माण करण्याचे कुटील कारस्थान पैशाच्या मागे लागलेल्या राजकारण्यांचे आहे.
या चित्रपटाच प्रीती झिंटा तुझी नायिका आहे. तिच्याबद्दल थोडे सांग?
ती खूप धीरगंभीर अभिनेत्री आहे. पंजाबी राहणीमान शिकण्यासाठी तिने क्लास लावला होता, हे कुणाला पटेल का. ती सेटवर येऊन पंजाबी बोलू लागली तेव्हा मी स्तब्धच झालो. मी प्रीतीबरोबर चार ते पाच चित्रपट केले आहेत. त्यामुळे आमच्यात चांगला ताळमेळ आहे.
'हीरोज़' चित्रपटाचा युद्ध आणि युध्धभूमीशी काहीच देणेघेणे नाही, हे खरे आहे का?
होय. 'हीरोज़' चा युद्ध आणि लढाईशी काहीच सबंध नाही. 'गदर', 'बॉर्डर' अथवा 'माँ तुझे सलाम' सारख्या चित्रपटांसारखा हा चित्रपट नाही.
तू हा चित्रपट पाहिलास?
हो. मी ट्रायलच्यावेळी पाहिला. 'हीरोज़' बघताना माझ्या डोळ्यातून सात वेळा पाणी आले. चित्रपट बघताना डोळ्यातून अश्रू येण्याची ही पहिलीच वेळ होती.
समीर यांच्या 'नन्हे जैसलमेर' आणि 'क्यूँ हो गया ना' हे चित्रपट फ्लॉप झाले तरीही तू या चित्रपटात काम करण्याचा निर्णय कसा घेतलास?
'नन्हे जैसलमेर' या चित्रपटासाठी मी समीरला नकार दिला होता. पण, त्याने काहीच ऐकले नाही. 'हीरोज़' ची ऑफरही मी नाकारली होती. पण, प्रोजेक्ट पाहिल्यानंतर मी राजी झालो. हा चित्रपट निश्चितच हिट होईल, असा माझा विश्वास आहे.
