1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. 'बोले' तो स्टार...

मी सरळमार्गी युवती आहे - मुग्धा गोडसे

मी सरळमार्गी युवती मुग्धा गोडसे
IFMIFM
मधुर भांडारकरांच्या 'फॅशन' या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न मुग्धा गोडसे करत आहे. मॉडलिंगमधून चित्रपटात पदार्पण करणा-या मुग्धाला चित्रपटातही मॉडेलचा रोल मिळाला. या चित्रपटात तिच्याबरोबर प्रियंका चोप्रा आणि कंगना सारख्या अभिनेत्री आहेत. याचित्रपटाच्या अनुभवाबाबत बोलताना तीनमनमोकळ्यगप्पमारल्या...

म्हणते तुझ्या रूपात मधुर भांडारकरांना चांगली अभिनेत्री मिळाली असे तुला वाटते?
निश्चितच. कारण चित्रपटाचे श्रेय मलाही मिळते. कारण पाहिल्याच्यावेळी प्रियांका आणि कंगनासारख्या अभिनेत्रियांसमवेत काम करणे सोपे नाही.

तू मॉडेल आहेस आणि चित्रपटातही मॉडेलचा रोल केला आहेस. त्यामुळे हा रोल करताना तुला काहीच समस्या आली नसेल?
हे बोलण्यास आणि ऐकण्यास सोपे आहे पण, इकतेही सोपे नाही. मी जशी आहे तशी ही भूमिका नव्हती. आणि अभिनय आणि मॉडलिंगमध्ये फरक आहे.

मग तूच सांग तू कशी आहेस?
मी एक सामान्य आणि मध्यमवर्गीय मुलगी आहे.

चित्रपटातील तुझ्या भूमिकेबद्दल थोडे सांग?
जेनेट या भूमिकेत मी आहे. जेनेट ही चांगली मुलगी आहे. पण, ती यशस्वी मॉडल नाही. ती दूस-यांना मदत करत असते. फॅशन जगतात खूप काळ असल्याने तिला पडद्यामागील चित्रही माहीत असते.


मॉडल या नात्याने तुझ्यापेक्षा जास्त अनुभव असणा-या कंगनाला रॅंपवा चालण्यासाठी तू काही टिप्स दिल्यास? ती स्वतः: चांगली अभिनेत्री असल्याने तिला सल्ल्याची गरज नाही. तिने मला काही मी सातत्याने फॅशनवरच बोलायचो. मॉडलिंगमध्ये प्रियांका चोप्रा मला सीनियर आहे, त्यामुळे मलाच त्यांच्या सल्ल्याची गरज पडली.

मधुर यांचे चित्रपट वास्तवावर आधारीत असतात. या चित्रपटात वास्तववादी अर्थात वादाची दृश्ये आहेत?
हा प्रश्न तुम्ही मधुर सरांना विचारा अथवा चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा करा.

मॉडेलिंग क्षेत्रात तुझी आयडॉल कोण आहे?
जेसी रंधावाची मी चाहती आहे. आम्ही चांगल्या मैत्रिणीही आहोत. मी फॅशन क्षेत्रात आल्यापासून मी त्यांना ओळखते. कॅरोल आणि नीनाही मला आवडतात.

पुरुष मॉडल्समध्ये तुझी पसंत?
अर्जुन रामपाल आणि मिलिंद सोमण.

चित्रपटानंतर तुला उत्तम अभिनेत्री म्हणायचे की, मॉडल?
माझ्या मतानुसार उत्तम अभिनेत्री.

म्हणचे तू मॉडलिंग सोडणार?
नाही, मॉडलिंग कधीही करता येऊ शकते पण, मी पहिल्यासारखा वेळ देऊ शकणार नाही.


'फॅशन' शिवाय कोणते चित्रपट करते आहेस?
काही प्रस्ताव आहेत. परसेप्ट पिक्चर कंपनीचा एक चित्रपट मी साइन केला आहे. काही पटकथा मी वाचत आहे. गचांगल्या वाटल्या तर मी साइन करेन.

मधुर भांडारकर यांच्याविषयी थोडे सांगशील?
मधुर सर कोणत्याही कलाकाराकडून अभिनय करून घेऊ शकतात. मी चांगला अभिनय करू शकते असा त्यांनीच विश्वास दिला. मी कधीच अभिनय केला नसल्याने मी भूमिका करू शकणार नाही, असे मी त्यांना सांगितले होते पण, त्यांनी आत्मविश्वास वाढविल्याने मी ही भूमिका करू शकले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा