यात काय चूक: सेलिना
|
'गोलमाल रिटर्न' तू साकारलेल्या भूमिकेविषयी काही सांगू शकतेस?
मी त्यात दक्षिण भारतीय ब्राह्मणाची मुलगी मीरा नायरची भूमिका साकारली आहे. ती मराठी तरूण म्हणजेच श्रेयस तळपदेवर प्रेम जीवापाड करत असते. मीरा ही मध्यमवर्गीय परिवारातील परंपरावादी मुलगी आहे. त्यात अतिशय साधा पेहराव आहे. प्रेक्षक लांब कुर्ता, जीन्स व दक्षिण भारतीय साडीत मला पाहणार आहेत.
यात असा कुठलाच ग्लॅमरस नाही, तरी ही आपण असा रोल करणे पसंत कराल?
खरं सांगायचे तर मी माझ्यासाठी कुठलीच चौकट आखून ठेवलेली नाही. मी प्रत्येक भूमिका करण्याची माझी इच्छा आहे. ग्लॅमरस नायिका म्हणून जरी माझी बॉलीवूडमध्ये ओळख असली म्हणजे काय माझ्या प्रतिभा नाही?
|
माझ्या गेटअपनेच बरेचसे काम करून टाकले होते. बाकी राहिलेले दिग्दर्शक व कॅमरामन यांच्या मदतीने करून घेतले. गेल्या वर्षी दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी मी पिवळ्या रंगांचा सलवार परिधान करुन एका कार्यक्रमात गेली होती. तेव्हा काढण्यात आलेले माझे छायाचित्र एका वृत्तपत्रात प्रसिध्द झाले होते. त्याला पाहून 'गोलमाल रिटर्न' चे दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना वाटले की़ मी त्यांची मीरा नायर होऊ शकते. दक्षिण भारतीय लुक देण्यासाठी माझ्या डोळ्यांचा रंग काळा करण्यात आला व मी ती भूमिका साकारली.
'गोलमाल रिटर्न' च्या प्रचारात तू दिसली नाही?
माझे काम अभिनय करणे आहे. प्रचाराचे काम तर निर्मात्याचे आहे.
चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव कसा राहीला ?
उत्कृष्ट, आम्ही सगळ्यांनीच खूप मस्ती केली. शूटिंग गोवा व थाईलॅन्ड सारख्या मनमोहक स्थळी करर्यात आली आहे. सगळ्यात जास्त मस्ती तर दिग्दर्शक रोहित शेट्टीने केली. एक दिवशी त्यांनी माझ्या मागे कु्त्र्याला लावले होते म्हणून आम्हीही हॉटेलमध्ये त्यांना भूत बनवून घाबरवले होते.
करीना कपूरसोबत काम करण्याचा अनुभव कसा राहीला ?
करीना कपूरसोबत माझा कुठलाही सीन नाही, त्यामुळे मी याबाबत काहीच बोलत नाही.
तू मल्टीस्टार चित्रपटातच अधिक दिसते ?
यात काय चूक आहे? आज असा कुठलाच कलाकार नाही की, तो मल्टीस्टार चित्रपटात काम करत नाही. प्रेक्षक ही असेच चित्रपट पसंत करतात.
तुझ्या करियर विषयी काही विचार केला असेलच?
हो, माझे करियर चांगल्या मार्गाने विकास करत आहे. चांगली मिळकत देखील मिळत आहे. चाहते ही माझे खूप आहेत. आणि हे चांगल्या अभिनयाचे फळ असल्याचे मी समजते.
असे कुठले कॅरेक्टर आहे ते तुला अजून साकारायचे बाकी आहे?
माझे बॅकग्राऊंड आर्मी जीवन आहे. त्यामुळे एक आर्मी ऑफिसर किंवा पोलीस अधिकारीची भूमिका करण्याची माझी मनापासून इच्छा आहे.
तुझे आगामी चित्रपट?
पेइंग गेस्ट, हॅलो डार्लिंग, रण भोला रण, शोमॅन, चाय गरम आदी.
|
