1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. 'बोले' तो स्टार...

''मुन्नाभाई'' ऐवजी ''सत्तारभाई''- सुनील शेट्टी

मुन्नाभाई ऐवजी सत्तारभाई सुनील शेट्टी
IFMIFM
अभिनेत्यांसोबत सुनील शेट्टी आता चित्रपट निर्माताही बनला आहे. त्याच्या बॅनरखाली त्याचा पहिला चित्रपट 'ई.एम.आई.' ( इझी मंथली इंस्टॉलमेंट) 7 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. त्यात संजय दत्त, उर्मिला मातोंडकर, अर्जुन रामपाल, मलाइका अरोरा खान आदी कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. सुनील शेट्टीने पहिला चित्रपट 'ई.एम.आई.' च का तयार केला, या विषयी त्याच्याशी केलेली बातचीत...

'ईएमआई' तयार करण्याचा विचार कसा सुचला?
मला कथा चांगली वाटली. कारण आज प्रत्येक व्यक्तीशी 'ईएमआई' हा शब्द निगडित आहे. क्रेडिट कार्ड कंपन्या भारतात आल्या तेव्हापासून लोक क्रेडिट कार्डचाच वापर करत आहेत. त्याचा त्यांच्या जीवनावर कसा परिणाम होतो. हे यात दाखविण्यात आले आहे. चित्रपटात सत्तारभाई नामक रिकव्हरी एजंटही आहे. मी जेव्हा या पात्राच्या भूमिकेविषयी विचार केला तर सगळ्यात आधी मला संजय दत्त (मुन्नाभाई) आठवला. सत्तारभाईची भूमिका तो चांगला साकारू शकतो. त्याच्यावर माझा विश्वास होता. भविष्यात 'मुन्नाभाई' ऐवजी प्रेक्षक संजयला 'सत्तारभाई' याच नावाने ओळखतील.
IFMIFM


ईएमआई हा एक गंभीर विषय आहे. मात्र चित्रपट इतका गंभीर नाही, याचे कारण काय?
असे नाही. प्रोमो पाहिल्यानंतर तसे वाटत असले तरी चित्रपट मजेदार आहे. संजय दत्तच्याच भोवती जास्त वेळ कॅमेरा फिरला असल्याने प्रेक्षकांना नव्या भूमिकेत तो आवडेल. रिकव्हरी करण्यासाठी कर्जदारांना चांगलाच झोडपतो. मात्र त्याला कळून चुकते की, परिवारातील अडचणी काय असतात. याचा अर्थ असा की, चित्रपटातून समाजप्रबोधनही केले गेले आहे. यासाठीच तर मी निर्माता बनला आहे.

सुनील, तू यात अभिनय का केला नाही ?
प्रॉडक्शन व अभिनय यांना नेहमी वेगवेगळे ठेवले पाहिजे. मी माझ्याच चित्रपटात काम करून चमकत राहिलो तर प्रेक्षक काय म्हणतील. एका वेळी दोन भूमिका करणे म्हणजे मला तर तारेवर कसरतच करावी लागेल. मला माझ्या पहिल्या चित्रपटाकडून जरा जास्तच अपेक्षा आहेत. त्या तर पूर्ण झाल्या पाहिजेत की नाही!

भविष्यात दिग्दर्शन करणे तुला आवडेल का?
का नाही. सध्या अनेक कामे एकत्र करत असल्याने भविष्यात दिग्दर्शन करू शकेल, असे मी आत्मविश्वासाने सांगतो.

'ईएमआई' बाबत आणखी काही सांगशील?
'ईएमआई' मध्ये अशा स्वभावाची पात्र आहेत. कर्ज तर घेतात परंतु कर्जाचा हप्‍ता भरताना त्यांच्या नाकी नऊ येतात. आशीष चौधरी व नेहा ओबेरॉय लग्नानंतर घर, कार व प्रत्येक गरजू, चैनीच्या वस्तू क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून खरेदी करतात. डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करून 'आ बैल मुझे मार' अशी परिस्थिती निर्माण करतात. पुष्कर नामक तरुणाला परदेशात जायचे असते. परंतु त्याच्या वडीलांकडे पैसे नसतात. त्याचे वडील कर्ज घेऊन त्याला परदेशात पाठवतात. मात्र तो तेथून रिकाम्या हाताने परततो. तेव्हा त्याच्यासह कुटुंबासमोर प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे 'ईएमआई' कसा भरायचा? अर्जुन रामपाल, उर्मिला व मलाइका यांच्या भूमिका देखील अशाच प्रकारच्या आहेत.
IFMIFM

तुझ्या आणखी कुठल्या चित्रपटांचे काम सुरू आहे?
मुंबईतल्या लोकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटावर आधारित 'अ लिटिल गॉडफादर' चे काम सुरू आहे. या चित्रपटाची कथा अतिशय भावनात्मक आहे. 'मुंबई चकाचक' ही अशा व्यक्तिची कथा आहे की, मुंबईला स्वच्छ व सुंदर करण्याचे त्याचे स्वप्न आहे. तसेच इंद्र कुमारचा 'डॅडी कूल' मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा