1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. 'बोले' तो स्टार...

संगीतशिवाय जगूच शकत नाही : हिमेश

संगीतशिवाय जगूच शकत नाही  हिमेश
IFM
युवावर्गावर आपल्या आवाजाची मोहिनी घालणा-या हिमेश रेशमियाने आता अभिनयामध्येही आघाडी घेतली आहे. ‘आपका सुरूर’ या चित्रपटानंतर नुकताच त्याचा ‘कर्ज’ प्रदर्शित झाला आहे. सुभाष घई यांच्या ‘कर्ज’ चा रीमेक करताना हिमेशने ऋषि कपूर यांनी यादगार केलेली ‘मॉटी’ ची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे ही भूमिका पाहून त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. 2009 मध्ये त्याचे अनेक चित्रपट येत आहेत. संगीत आणि अभिनय क्षेत्रातील प्रवास त्याच्याशी संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संगीताशिवाय आपण जगू शकत नाही असे तो म्हणाला. त्याच्याशी साधलेला हा संवाद...


संगीतातून थेट अभिनयाकडील तुझ्या प्रवासाबद्दल थोडे सांग?
संगीत देण्याचा माझा छंद व्यवसायात बदलल्यानंतर माझ्या रक्तात संगीत भिनले. संगीतक्षेत्रात माझी वेगळी ओळख झाल्यानंतर मी अभिनय करावा, अशी अपेक्षा माझ्या चाहत्यांकडून होऊ लागली आणि मी 'आपका सुरूर' या चित्रपटातून प्रयत्न केला. माझ्या चाहत्यांनी दिलेला प्रतिसाद पाहून ‍मी भारावून गेलो. लोक काहीही म्हणो पण, माझ्या चाहत्यांनी मला साथ दिल्याने आत्मविश्वास वाढला आणि मी कर्ज मध्येही भूमिका केली. लवकरच माझे ‘मुड़-मुड़ के न देख’, ‘कजरारे’, ‘ए न्यू लव स्टोरी’, 'हे गज्जू' , ‘इश्क अनप्लग्ड’ हे चित्रपट प्रदर्शित होत आहेत.

अभिनयाची प्रेरणा कोणाकडून मिळाली?
माझ्या चाहत्यांकडून अभिनयाची प्रेरणा मिळाली. ‘आपका सुरूर’ चित्रपटानंतर माझा आत्मविश्वास वाढला. समीक्षकांनीही कौतुक केले.

आपल्या चित्रपटाव्यतिरीक्त दुस-या चित्रपटासाठी कधीच संगीत देण्याचा विचार नाही?
हो ते खरे असले तरी त्याचे कारण वेगळे आहे. वर्षभरात माझेच पाच चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे मला दुस-यांच्या चि‍त्रपटासाठी संगीत देण्यास वेळच मिळत नाही.

तुझ्या चित्रपटात नेहमीच नवे चेहरे दिसून येतात?
तो योगायोग होता. आता मी अनुभवी कलाकारांसमवेत काम करणार आहे. पण, कलाकार अजूनही निश्चित नाही.

समीक्षकांच्या म्हणण्यानुसार तु नाकातून गातोस, हे ऐकताना तुला कसे वाटते?
मी या सर्व टिका आनंदाने स्विकारतो.

जर तू या क्षेत्रात नसतास तर कोणते क्षेत्र आवडले असते?
संगीत, गायन आणि अभिनयाशिवाय मी विचारच करू शकत नाही. त्यामुळे याबाबतीत मी काहीच बोलू इच्छित नाही.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा