1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. 'बोले' तो स्टार...

कायदा मोडण्याची खुमखुमी - दिबाकर बॅनर्जी

कायदा मोडण्याची खुमखुमी  दिबाकर बॅनर्जी
IFM
'खोसला का घोसला' सारख्या चित्रपटाची निर्मिती करणा-या दिबाकर बैनर्जी यांचा 'ओए लकी, लकी ओए' हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यामध्ये त्यांनी एका चोराला आपल्या चित्रपटाचे प्रमुख पात्र बनविले आहे. या आगळ्या वेगळ्या थीमबाबत त्यांच्याशी चर्चा केली असता मला कायदा मोडण्याची खुमखुमी आहे आणि वास्तविक जीवनात ती पुर्ण करता येणे शक्य नसल्याने चित्रपटाच्या माध्यमातून पुणे केल्याचे त्यांनी सांगितले.

चोर या संकल्पनेवर चित्रपट बनविण्याची संकल्पना कशी सुचली?
मी कायदा मानत नाही पण, सामान्य जीवनात कायदे पाळण्याशियाय पर्याय नसल्याने मी चित्रपटाच्या माध्यमातून माझी इच्छापूर्ती करत आहे. आपण एका चोराच्या दृष्टीकोनातून पाहिले तर तो स्वत:ला कधीच गैर मानत नाही. पण, चोरी करणे चुकीचे असल्याचे समाज मानतो.

पुन्हा एकदा तुम्ही दिल्ली निवडली आहे. हे शहर तुम्हाला का आकर्षित करते?
कारण मी दिल्ली जवळून अनुभवली आहे. याचठिकाणी माझा जन्म झाला आणि येथेच मी मोठा झालो. मी अवैध धंदा करणा-या अनेक गॅग मला माहित आहेत. ज्या भागात मी वाढलो तेथे हफ्ता वसूलीची पध्दत मी पाहिली आहे. या सगळ्या बाबींचे मी जवळून निरीक्षण केले आणि तेच या चित्रपटात उतविण्याचा प्रयत्न मी केला आहे.

चित्रपटाच्या कथेबाबत थोडे सांगा?
मला कायमच विषमता आकर्षित करते. चित्रपटातील लकीचे पात्र वेगळ्याच धाटणीचे आहे. एकीकडे तो चोर आहे आणि दुसरीकडे तो समाजात ताठ मानेने जगण्याची अपेक्षा करतो आहे. माणसाला अनेकवेळा काही गोष्टी मनाविरूध्द कराव्या लागतात किंवा त्याचा स्वभावहा असतो पण, त्याला दुसरी कडही असते. तेच या चित्रपटातून दाखविण्याचा माझा प्रयत्न आहे.

चित्रपटाचे शिर्षक वेगळे वाटते?
मला काहीच वेगळे वाटत नाही. लकी माझ्या नायकाचे नाव आहे. त्यामुळे चित्रपटाच्या टायटलमध्येही लकी नाव जोडण्यात आले आहे. 'ओए लकी, लकी ओए' ही दिल्लीची स्टाईल आहे. येथे लोकांना अशीच हाक मारली जाते.

दिल्लीत कुठे-कुठे शूटिंग केलीत?
जास्तकरून माहित नसलेली स्थळे निवडली. बॉलीवुडमध्ये शक्यतो ही स्थळे दाखविण्यात आलेली नाहीत.

अभय देओल यांना निवडण्यामागे खास कारण आहे का?
अभयला चोराच्या भूमिकेसाठी निवडणे काहींना अजीब वाटू शकते पण, अभय हा प्रेमळ चोरासारखा दिसतो. तो एकदम कूल दिसतो आणि नॅचरल कलाकार आहे. त्याच्यातील हे गुण हेरूनच मी त्याला संधी दिली.

तुम्ही लहानपणी कधी चोरी केली होती?
होय, मी लहानपणी माझ्या मित्रांची नाणी चोरत असे.

जर तुम्हाला चोरी करण्याची संधी मिळाली तर तुम्हा काय चोरणे पसंत कराल?
काही वर्षांपूर्वी मी माझ्या पत्नीबरोबर ग्रीस गेलो होतो. तेथे 'एंटिक शॉप' मध्ये की सुंदर खुर्ची पाहिली होती. ती खुप महाग होती. ती चोरणे मी पसंत करेन.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा