1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. 'बोले' तो स्टार...

शाहरुख-सलमान माझे चांगले मित्र - आमिर

IFM
'गजनी' च्या माध्यमातून आमिर खानने शुद्ध व्यावसायिक चित्रपट केला आणि चित्रपटाने रेकॉर्ड तोडण्‍यास सुरूवात केली. यामुळे आमिर खुपच खुश आहे. त्याला प्रतिक्रियांची प्रतिक्षा लागून राहिली आहे. आपल्या या चित्रपटाबाबत त्याने 'वेबदुनिया'शी मनमोकळ्या गप्पा मारल्या. शाहरूख आणि सलमान आपले चांगले मित्र असल्याचे त्याने आवर्जुन सांगितले.

आपल्या डोळ्यांतून सारे काही व्यक्त करणारी भूमिका साकारणे कठीण वाटले का?
- खुपच कठीण. कारण, चित्रपट नायक आणि नायिकेवर आधारीत असतो. आणि प्रेक्षकांच्या नजरा त्यांच्यावर असतात. त्यामुळे या मध्यवर्ती भूमिकाच डळमळल्या तर चित्रपटावर परीणाम होऊ शकतो. त्यात अशा भूमिका करणे म्हणचे एक आव्हानच होते. मी माझ्या परीने चांगले करण्याचा प्रयत्न केला आहे. आता प्रेक्षकांच्या मताची प्रतिक्षा आहे.

'गजनी' हे नाव खलनायकावरून का ठेवले?
- चित्रपटाचा नायक 'गजनी' या खलनायकाचा बदला घेण्यासाठी पेटून उठतो. म्हणजे त्याच्यासमोर 'गजनी' हे एकच लक्ष्य असते. म्हणून या नावाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

'गजनी' ची प्रेरणा तुला कोणाकडून मिळाली?
- तमिळ चित्रपट 'गजनी' चा नायक सूर्याकडून मला ही प्रेरणा मिळाली. त्यानेही खुपच उत्तम काम केले आहे. चित्रपट पाहिल्यानंतर ही भूमिका मला जमेल की नाही, असा प्रश्न मला पडला होता पण, सूर्यानेच माझा आत्मविश्वास वाढवला आणि मी करून दाखवले.

सलमानने 'गजनी' वर काही चित्रे काढून तुला गिफ्ट केली, या मागचे कारण काय वाटते?
- खरे सांगायचे झाले तर सलमानने माझे मन जिंकले आहे. सलमानकडे मी एक चांगला कलाकार म्हणून पाहतो. त्याने दिलेली चित्रे इतकी उत्तम आहेत की ती माझ्या कायमच स्मरणात राहतील. यापाठीमागे केवळ चांगली मैत्री एवढेच कारण आहे.

सलमानबरोबच मैत्री वाढवून तुम्ही शाहरुखला शह देत असल्याचे बोलले जात आहे?
- या चर्चा खोट्या आहेत. शाहरुख आणि सलमान हे दोघेही माझे चांगले मित्र आहेत. त्याच्या विरोधात कॅम्प अथवा टीम करण्‍याच्या चर्चा होत असल्या तरी आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही.

अनुष्का आणि असीनने यावर्षीच पदार्पण केले आहे. तुला यांच्यातील उत्तम कोण वाटते?
- असा फरक करता येऊ शकत नाही. माझ्या दृष्टीने दोघीही चांगल्या अभिनेत्री आहेत आणि दोघींमध्येही मी तेवढीच गुणवत्ता पाहिली.

तुझ्यामते बॉलीवुडमध्ये कोणाची बॉडी सर्वांत आकर्षक आहे?
- अभिनेत्यांमध्ये जॉन अब्राहम आणि ऋतिक रोशन तर अभिनेतत्रींमध्ये करीना कपूर
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा