1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. 'बोले' तो स्टार...

लहानपणापासूनच शाहरूखच्या प्रेमात - अनुष्का

लहानपणापासूनच शाहरूखच्या प्रेमात  अनुष्का
IFM
आपल्या उत्तम अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकणा-या अनुष्का शर्माने बॉलीवूडमध्ये दणक्यात आगमन केले. यश चोप्रा यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवत कौतुक केले आणि आर्शिवाद दिला. मला शाहरूख खान यांच्याबरोबच मी काम करेन, असे मला स्वप्नवतही नव्हते. त्यांनी मला आत्मविश्वास दिला. खरेतर मी लहानपणापासूनच त्यांची चाहती आहे, असे तिने मुलाखतीत सांगितले.

यशराज फिल्मने इतर अभिनेत्रींप्रमाणे ग्लॅमर भूमिका दिली नाही, याबाबत तू काय सांगशील?
- बरोबर आहे, यशराज फिल्म्समध्ये नेहमीच अभिनेत्रींना गॅमरस दाखविण्यात येते. माझी पार्श्वभूमीही तशीच आहे आणि पहिल्या चित्रपटात मी सुंदर दिसावे असे मलाही वाटत होते पण, चित्रपटाची मागणी वेगळीच होती. आणि मी ते केल्यामुळेच मला इतके यश मिळाले आहे.


या चित्रपटासाठी तुझी निवड कशी झाली?
आदित्य चोप्रा यांनी ऑडिशन घेऊन माझी निवड केली. मला चित्रपटांचा फारसा अनुभव नाही आणि येथील लोकांची माझी ओळखही नव्हती. ऑडिशनंतर माझी निवड झाल्याचे सांगण्यात आले आणि मी भारावून गेले. हा अनुभव अविस्मरणीय होता.


शाहरुखबरोबरचा अनुभव कसा होता?
खरे सांगायचे झाले तर मी लहानपणापासूनच शाहरूख यांची चाहती आहे. माझे वडील सैन्यदलात आहेत. त्यांच्या कार्यक्रमांमध्ये मी शाहरूखच्या गितावरच डान्स करायचे. ‘बाजीगर’मधील गाणी मला खूप आवडतात. शाहरुख ज्या पध्दतीने स्वत:ला सादर करतो ती पध्दत मला भावली. त्यांच्याबरोबर चित्रपट केल्यानंतर हा आदर आणखीनच वाढला आहे. वेगळ्या भाषेत सांगायचे झाले तर ‘रब ने बना दी जोडी’ या शाळेत शाहरुख माझे शिक्षक होते.

अभिनय करताना काही समस्या आल्या काय?
- नाही, मला यासाठी विशेष प्रयत्नही करावा लागला नाही. मी मॉडलिंग करायचे आणि हा देखील एक अभिनयच आहे. रॅम्पवर आपण विचारांचे प्रतिनिधीत्व करतो. चित्रपटात आपण स्वत:ला सादर करतो. आणि मी जशी आहे, तशीच भूमिका असल्याने काहीच प्रश्न नव्हता.

माझे पाय जमिनीवरच..
   वास्तविक जीवनात मी सामन्य कुटूंबातील सामान्य मुलगी आहे. मी चांगले कपडे घालून रॅम्प कॅटवॉक करू शकते पण, मी 'तशी' नाही. सामान्य असल्यानेच 'रब ने बना दी जोडी' मध्ये सामान्य मुलीची भूमिका तेवढ्या ‍जीवंतपणे करू शकले.      
तुझ्या पार्श्वभूमीबाबत थोडे सांगशील?
मी बेंगलोरची आहे आणि माझे वडील सैनिकअधिकारी आहेत यामुळे मी स्वत:ला भाग्यशाली समजते. मी मॉडेलिंग केले आहे आणि अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला नाहे. यासाठी माझे मुंबईत येणे-जाणे असायचे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा