1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. 'बोले' तो स्टार...

मी चित्रपटांवर प्रेम करते - जोया अख्तर

मी चित्रपटांवर प्रेम करते   जोया अख्तर
WD
जावेद अख्तर आणि हनी ईरानी यांची मुलगी जोया अख्तरला घरातच चित्रपटांचे बाळकडू मिळाले. त्यामुळे तिनेही हेच क्षेत्र निवडले. जाहिरात, म्युझिक व्हिडिओनंतर तिने 'दिल चाहता है' आणि 'लक्ष्य' सारख्या चित्रपटांमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. 'हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड' च्या चित्रपटाची निर्मिती केली. 'लक बाय चांस' या चित्रपटाच्या माध्यमातून जोयाने दिर्ग्दकामध्ये पाऊल ठेवले आहे. 30 जानेवारीला प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटात फरहान अख्तर, जूही चावला, कोंकणा सेन शर्मा, ईशा श्रावणी, ऋषी कपूर, डिंपल कपाडि़या आणि ऋतिक रोशन यांच्यासारख्या अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाबाबत तिच्याशी मनमोकळ्या गप्पा मारता आल्या. घरात चित्रपटाचेच वातावरण असल्याने मी चित्रपटावर मनापासून प्रेम करत असल्याचे तिने सांगितले. तिच्याशी केलेली ही बातचि‍त...

दिग्दर्शक होण्याचा निर्णय कसा घेतलास?
याचे उत्तर खूपच सोपे आहे. मी चित्रपटावर प्रेम करते. मी चित्रपटांच्या वातावरणातच मोठी झाली. आई-वडिलांबरोबर चित्रपट बघायचे आणि त्यानंतर आम्ही एकत्रितपणे चित्रपटाबाबत चर्चा करत असत. त्यामुळे चित्रपटांबाबत माझा दृष्टिकोन वेगळा आहे. मी विचार करून हे करियर निवडले नसून आपसुखच या क्षेत्रात आले आहे.

'लक बाय चांस' मध्ये दिग्दर्शक म्हणून जबाबदारी स्वीकारण्यामागचे कारण?
माझ्या डोक्यात अनेक विचार होते. पण, एका झपाट्यात मी कथा लिहून टाकली. माझ्या मनातील कथा आहे तशी पडद्यावर यावी, यासाठी मी दिग्दर्शकाची जबाबदारी स्वीकारली.

कलाकारांची निवड करताना खूपच तसदी घ्यावी लागली?
होय, मी याबाबतीत तडजोड करत नाही. मुख्य भूमिकांसाठी कलाकारांची निवड करताना मला तसदी घ्यावी लागली.

फरहान अख्तरला संधी देण्यामागचे कारण?
माझी मैत्रीण रीमा कागतीने मला त्याला घेण्याचा सल्ला दिला. या भूमिकेसाठी मलाही तो पर्फेक्ट वाटला. फरहान का रितेश असा काहीच विचार माझ्या डोक्यात नव्हता.

या चित्रपटाबाबत थोडे सांगशील
बॉलीवूडमध्ये कधी काय होईल ते सांगता येत नाही. कोणता चित्रपट धाडकन आपटेल आणि कोणता यशस्वी होईल, ते काही सांगता येत नाही. बहुतेक याच कारणामुळे येथील लोक नशिबावरच विश्वास ठेवतात. हाच धागा पकडून मी चित्रपटाची निर्मिती केली आहे. एक स्ट्रगलर आणि एक सुपरस्टार एकमेकांना भेटतात आणि त्यांचे जीवनच बदलून जाते, अशी कथा आहे.

'लक बाय चांस' चे दिग्दर्शक करताना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले?
मी काम सुरू केले की सगळ्या गोष्टी आपोआप सहजसोप्या होऊ लागतात. या चित्रपटाला अपयश मिळाले तरी मी निराश होणार नाही, हेच माझ्यासाठी खरे आव्हान असणार आहे.

चित्रपटातील संगीताच्याबाबतीत थोडे सांग?
याबाबतीत शंकर, अहसान, लॉय आणि माझ्या वडिलांनी चांगले काम केले आहे. सगळीच गीते ऐकण्यास मधुर आहेत आणि त्या त्या प्रसंगांना अनुरूप आहेत.

फिल्म इंडस्ट्रीला आणखी महिला दिग्दर्शकांची गरज आहे, असे वाटते?
महिला किंवा पुरुष नव्हे तर चांगल्या दिग्दर्शकांची गरज आहे.

भविष्यात अभिनय करण्याचा विचार आहे?
नाही.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा