क्रिकेट माझ्या आवडीचा खेळ- शिल्पा शेट्टी
|
राजस्थान रॉयल्स संघात तुझे योगदान काय असेल?
या संघाकडे सर्व काही आहे. फक्त ग्लॅमर नव्हते. माझ्यामुळे ही कमतरताही दूर होईल. अर्थात (हसत हसत) मी मैदानावर जाणार नाही हे लक्षात घ्या.
तुमच्या ग्लॅमरचा उपयोग संघासाठी कसा होईल?
आम्ही आमच्या संघाचा एक म्युझिक व्हिडीओ करणार आहोत. लवकरच त्याचे शुटींग होईल. त्यात माझा सहभाग असेलच. माझे 'द मॅन' आणि 'डिझायर' हे दोन चित्रपट जवळपास पूर्ण झाले आहेत. त्यामुळे आयपीएलकडे देण्यासाठी माझ्याकडे बर्यापैकी वेळ आहे.
राज कुंद्रा म्युझिक व्हिडीओचे दिग्दर्शन करणार आहेत काय?
ते पाहूया. राज क्रिकेटचा मोठा फॅन आहे. तो इंग्लंडमध्येच रहातो आणि क्रिकेटचा जन्म तिथेच झाला आहे. सहाजिकच क्रिकेटशी त्याचे नाते घट्ट आहे. म्हणूनच आयपीएलमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्याने घेतला.
तूही क्रिकेट फॅन आहेस काय?
मलाही क्रिकेट अतिशय आवडते. माझ्या वडिलांमुळे ही आवड माझ्यात आली. त्यांच्याइतका क्रिकेट फॅन मी आजपर्यंत पाहिलेला नाही. राजस्थान रॉयल्समध्ये आम्ही घेतलेला हिस्सा ही वडिलांना दिलेली भेट आहे.
आम्हाला वाटले की राजने ही आपल्याला दिलेली 'व्हॅलेंटाईन गिफ्ट' आहे?
(हसत हसत) मला वाटतं, व्हॅलेंटाईन डे साठी राजकडून बरीच गिफ्ट्स राजकडून येतील अशी आशा आहे.
यात लग्नाचा प्रस्तावही असेल काय?
तो तर मी स्वतः कधीही मागू शकते.
बॉलीवूड आणि क्रिकेटच्या वाढत्या जवळिकीविषयी काय सांगशील?
आयपीएलमध्ये शाहरूख खान आणि प्रीती झिंटा यांचे संघ आहेत. आता राजच्या निमित्ताने मी राजस्थान रॉयल्सशी जोडली गेली आहे. मी माझा पूर्ण वेळ या संघासाठी देईन. मार्चमध्ये होणार्या पहिल्या सामन्यालाही मी उपस्थित राहीन.
