श्रुतीचे पहिल्याच चित्रपटात बिकिनी दृश्य
|
श्रुतीला यासंदर्भात विचारलं, तर ती म्हणते, दिग्दर्शक सोहमने मला स्क्रिप्ट सांगितलं, त्याचवेळी बिकीनी शॉटची कल्पना दिली होती. पण माझ्या दृष्टिने तो फार महत्त्वाचा मुद्दा नव्हता. कारण कथेची गरज म्हणून मी बिकिनी घालणे गरजेच होते. बिकीनी घातल्यानंतर शॉट दिल्यानंतरही मला नर्व्हस वाटलं नाही, असं ती सांगते. तिला त्रास झाला, तो त्यावेळच्या हवामानाचा. कारण त्या दिवशी खूप थंडी होती. त्यामुळे बिकिनीत श्रुती कुडकुडत होती. बिकिनी दृश्य तिने अगदी सहजपणे दिले.
तिकडे सोहमनेही श्रुतीने दिलेल्या या दृश्याबद्दल कौतुक केले. श्रुतीने आपली फिगर शेपमध्ये आणण्यासाठी बरीच मेहनत केली आहे. तिची साकारलेली मेहनत आम्ही यात दाखवलीय,. हे दृश्य केपटाऊनमध्ये शूट केले आहे. त्यावेळी तापमान दोन डिग्री सेल्सियस होते. पाणीही बर्फासारखे थंड होते. तरीही श्रुतीने हा शॉट दिला हे विशेष, असे सोहम म्हणतो. या सीनमध्ये श्रुतीशिवाय इमरान खान, मिथून चक्रवर्ती व रवी किशनही आहे.
