''लक''ची भीती नाही, उत्सुकता वाटतेय- श्रुती
|
इमरान आणि मी गेल्या अनेक वर्षांपासूनचे मित्र आहोत. म्हणूनच एकदा सोहमने कथा सांगितली तेव्हा मी चटकन होकार दिला. ही नेहमीची चाकोरीबद्ध भूमिका नाही हे त्याचवेळी लक्षात आले आणि नायिकेला फारशी संधी नसणारी किंवा तिला वळचणीला टाकणारी ही कथा नाही याची जाणीवही झआली. म्हणूनच मी पटकन हा चित्रपट स्वीकारला, असे श्रुती सांगते.
यापूर्वी श्रुती आर. माधवनसोबत एका तमिळ फिल्ममधून चित्रसृष्टीत पदार्पण करणार अशी चर्चा होती. ' ही बातमी खरीच होती, पण तसे घडले नाही,' असे स्पष्टीकरण ती देते.
आपल्या या कामाबद्दल घरच्यांनीही पाठिंबा दिल्याचे सांगून श्रुती म्हणाली, त्यांना टेन्शन होते, ते संजय दत्त, मिथून चक्रवर्ती, डॅनी डेन्झोप्पा या दिग्गजांबरोबर मी काम कसे करेन याचे. पण या सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतले.
