आशुतोषने घेतलेली रिस्क
IFM
IFMएका गुजराती कादंबरीवर आधारीत हा चित्रपट आहे. एका मुलाला दहा दिवसांत लग्न करायचे असते त्यासाठी त्याला बारा राशींच्या बारा मुलींना भेटावे लागते. यातलीच एक मुलगी त्याला निवडायची आहे, अशी चित्रपटाची थीम आहे. चित्रपटाचा शेवट मात्र काहीसा बदलला आहे. कादंबरीसारखा नाही.
यात प्रियंका चोप्राने बारा भूमिका केल्या आहेत. वास्तविक या बारा भूमिकांसाठी बारा हिरॉईन्स घेणे अवघड नव्हते. पण त्यामुळे गोंधळ वाढला असता आणि कुणाला किती महत्त्व मिळाले याचीच चर्चा रंगली असती. या चित्रपटात हिरो हरमन बावेजा आहे. यापूर्वी आशुतोषने आमीर खान, शाहरूख खान, ह्रतिक रोशन, ऐश्वर्या राय यांच्यासारख्या बड्या कलावंतांबरोबर काम केले आहे. यावेळी पहिल्यांदाच त्याची स्टारकास्ट कमकुवत भासते आहे. हरमनला स्टार व्हॅल्यू नाही. त्याचे या आधीचे चित्रपट पडलेले आहेत. तरीही आशुतोषने हिरो म्हणून त्यालाच ठेवले आहे. एवढी रिस्क घेऊनही आशुतोष याकडे आव्हान म्हणून पहातो. आता बघूया हा चित्रपट यशस्वी ठरतो की काय ते?
