मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > ओळख कलावंताची
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
बरेली ते बॉलीवूड- एका जिददीचा प्रवास...  Search similar articles
- विकास शिंपी
priyanka chopra
IFMIFM
बॉलीवूडमध्ये प्रवेश मिळविण्यासाठीच्या रुळलेल्या वाटेवरूनच प्रियंका चोप्राने चित्रसृष्टीत प्रवेश केला. इथे प्रवेश मिळवण्यापर्यंतचे ठीक. मात्र, जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करीत नाहीत तोपर्यंत प्रचंड संघर्षाची तयारी असावी लागते. हिच जिदद घेऊन या क्षेत्रात प्रवेश केलेली आणि बरेलीसारख्या छोट्याश्या शहरातून येऊन प्रियंकाने आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

झारखंडमधील जमशेदपूर शहरात 18 जुलै 1982 ला जन्माला आलेली प्रियंका आज तिचा 26 वा वाढदिवस साजरा करीत आहे. एका डॉक्टर दांपत्याच्या घरात जन्माला आलेल्या प्रियंकाचे संपूर्ण शिक्षण बरेलीच्या संत मारीया गोरेट्टी शाळेत झाले. नंतर शिक्षणासाठी ती अमेरिकेत गेली. तेथून पुन्हा भारतात येऊन तिने मुंबईच्या ‘जयहिंद’ महाविद्यालयात शिक्षण घेतले. नंतर सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी शिक्षण सोडून ती तयारीला लागली. तिच्या प्रयत्नांना यश आले आणि तिने 2000 साली विश्व सुंदरी पुरस्कार मिळवून आपल्यातील कौशल्याची पहिल्यांदा जगाला जाणीव करून दिली.

विश्व सुंदरी पुरस्कार मिळविल्यानंतर प्रियंका पहिल्यांदा चित्रपटात आली. तमिळ चित्रपटांपासून कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या प्रियंकाने ‘थामिजहन’हा पहिला चित्रपट केला. तर २००३ मध्ये ‘द हिरो’च्या रूपाने तिने बॉलीवूडमध्ये प्रवेश केला. वास्तविक तिने 'बिग ब्रदर'हा पहिला चित्रपट साईन केला होता. पण तो 2007 मध्ये प्रदर्शित झाला.

अक्षयकुमार सोबत ‘अंदाज’ केल्यानंतर तिने अनेक यशस्वी चित्रपट दिले. 'अंदाज'साठी तर तिला उत्कृष्ट सहअभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. 2004 मध्ये सलमान खान आणि अक्षय कुमार सोबत आलेल्या ‘मुझसे शादी करोंगी’या चित्रपटाने तिच्या करिअरची गाडी रुळावर आली. 2005 मध्ये अक्षय कुमार सोबतच्या ‘ऐतराज’ चित्रपटात काही हॉट सीन देऊन तिने आपला एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला. या चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट खलनायिकेचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. नंतर ऋतिक रोशन सोबतचा क्रिश आणि किंग खान शाहरुख सोबतचा ‘डॉन’ या चित्रपटाने चांगला गल्ला जमविल्याने प्रियंकाची स्टार व्हॅल्युही वाढविली.

मात्र 2007 मध्ये आलेले ‘सलाम-ए-इष्क’ आणि बहुप्रतिक्षित ‘बिग ब्रदर’ हे दोन्हीही चित्रपट दणकून आपटले. 2008 मध्ये तिचा प्रियकर हरमन बावेजा सोबतचा चित्रपट लव्ह स्टोरी 2050 प्रेक्षकांनी नाकारला असला तरीही तिचा 'गॉड़ तूस्सी ग्रेट हो, अभिषेक बच्चन सोबतचा द्रोण, दोस्ताना, मधुर भांडारकरचा फॅशन आदी चित्रपटांची प्रतीक्षा आहे.

मधुर भांडारकर सोबतच्या 'फॅशन'मध्ये या चित्रपटात ती एका सुपर मॉडेलची भूमिका करीत असून प्रियंकाला आणि तिच्या चाहत्यांनाही चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. त्यात ती किती यशस्वी ठरते हे कळेलच. मात्र सध्या तरी प्रियंका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त 'बेवदुनिया'परिवाराकडून तिला हार्दिक शुभेच्छा!

फोटो गॅलरीसाठी येथे क्‍लीक करा
आणखी
सशक्त अभिनेता संजीवकुमार
हिंदीत करियर करायचे नाही
माधुरीचा चित्रपट प्रवास
मूर्तिमंत माधुर्य
हॅपी बर्थ डे अजय देवगण
ट्रॅजिडी क्वीन मीनाकुमारी (पुण्यतिथी-31 मार्च)