मंगळवार, 28 ऑक्टोबर 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: शनिवार, 23 जानेवारी 2021 (11:08 IST)

पुत्रदा एकादशी व्रत करण्याचे महत्त्व आणि मंत्र

Putrada Ekadashi Mantra
हे व्रत केल्याने आणि बाळ कृष्णाचे रुप पूजल्याने नि:संतान दंपतीला संतान प्राप्ती होते असे मानले जाते.
हे व्रत केल्याने संतानसंबंधी सर्व समस्या दूर होतात.
जीवनातील अडथळे दूर होऊन घरात सुख-समृद्धी येते.
या दिवशी मनोभावे श्री विष्णूंची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
मुलांच्या आरोग्यासाठी आणि त्यांच्या दीघार्युष्यासाठी हे व्रत केले जाते.
 
या दिवशी देवाची कृपा मिळविण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र, विष्णु सहस्त्रनाम स्त्रोतम, विष्णु अष्टोत्रम मंत्र जपावे.
 
या दिवशी घरात किंवा मंदिरात जाऊन विष्णुसहस्त्रनाम स्त्रोतम पाठ करावा.
दिवसभर उपास करावा. धान्य खाऊ नये.
जे उपास करत नाही त्यांनी देखील या दिवशी तांदूळाचे सेवन टाळावे.
संपूर्ण दिवस प्रभु भक्तीत घालवावा.
संध्याकाळी श्रीहरी ची विधीपूर्वक पूजा आणि आरती करावी.
गरजूंना वस्त्र, धान्य व दान-दक्षिणा देण्याने पुण्य लाभेल.