मुंबई बिघडविणार दिल्लीचे समीकरण?

IPL 2020
दुबई| Last Modified शनिवार, 31 ऑक्टोबर 2020 (13:45 IST)
मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र, ते दिल्ली कॅपिटल्सविरुध्द आज (शनिवारी) होणार्या आयपीएलच्या सामन्यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता विजय नोंदवून गुणतालिकेत अव्वलस्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करतील. या सामन्यात दिल्लीचा पराभव झाला तर दिल्लीचे गणित बिघडू शकते.
चेन्नईच्या कोलकातावरील विजयामुळे मुंबईचे प्ले ऑफमधील स्थान निश्चित झाले आहे. त्यांचे 16 गुण झाले आहेत व धावगतीही चांगली आहे. त्यांचा संघ अव्वल दोनमध्ये कायम राहणे जवळजवळ निश्चित आहे. दिल्लीचे 14 गुण असून त्यांचा संघ तिसर्याल स्थानी आहे.

सलग तीन पराभव झाल्याने दिल्लीचा संघ खडबडून जागा झाला असून त्यांना सामन्यातील कोणताही ढिलेपणा महगात पडू शकतो. त्यांना प्ले ऑफमधील आपले स्थान निश्चित करण्यासाठी एका विजयाची गरज आहे. त्यांचे मुंबई व बंगळुरूशी उर्वरित दोन सामने होणार आहेत. हे दोन्ही सामने गमवल्यास दिल्लीला स्पर्धेतून बाहेर पडावे लागू शकते.
स्नायू दुखावल्याने नियमित कर्णधार रोहित शर्मा सलग चौथ्या सामन्यातही बाहेर राहू शकतो. मात्र, मुंबईकडून अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिली गेलेली नाही. मुंबईने मागील सामन्यात बंगळुरूला पराभूत केले आहे ते दिल्लीविरुध्द अडचणी उभ्या करू शकतात.

मुंबईचे फलंदाज व गोलंदाज आपल्या परीने पूर्णपणे योगदान देत आहेत. याच्या विरोधात मागील काही सामन्यांमध्ये दिल्लीच्या फलंदाजांची कामगिरी संघासाठी अनुकूल झालेली नाही. हैदराबादविरुध्दच्या सामन्यात त्यांचे फलंदाज खूपच दबावाखाली दिसून आले. कगिसो रबाडा व एन्रिच नॉर्त्जे चांगली गोलंदाजी करत आहेत. मात्र, अन्य गोलंदाजांकडून त्यांना साथ मिळत नाही.
सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वा.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

AUSvIND: शुभमन गिलने गावसकरचा -50 वर्ष जुना विक्रम मोडला

AUSvIND: शुभमन गिलने गावसकरचा -50 वर्ष जुना विक्रम मोडला
टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिलने आतापर्यंत आपल्या फलंदाजीने प्रभावित केले आहे. ...

क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या ...

क्रिकेटपटू हार्दिक पांड्याच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि क्रुणाल पांड्या यांनी आज सकाळी ...

BANvWI: बांगलादेश पोहोचल्यावर वॉल्श झाला कोविड -19 ...

BANvWI: बांगलादेश पोहोचल्यावर वॉल्श झाला कोविड -19 पॉझिटिव्ह, ODI मालिकेतून बाहेर
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय आणि दोन सामन्यांच्या कसोटी ...

भारत-ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना : असा आहे ब्रिस्बेनचा ...

भारत-ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना : असा आहे ब्रिस्बेनचा इतिहास
भारतऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावसकर मालिकेतील चौथा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या मैदानावर ...

टीम इंडिया आणि सिराजची वॉर्नरने मागितली माफी

टीम इंडिया आणि सिराजची वॉर्नरने मागितली माफी
सिडनीमध्ये झालेल्या तिसर्या कसोटी सामन्यात भारताचे मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना ...