प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आज हैदराबाद-पंजाब भिडणार

IPL 2020
दुबई| Last Modified शनिवार, 24 ऑक्टोबर 2020 (07:50 IST)
सलग तीन विजयांनी पुन्हा एकदा विजयीपथावर परतलेल्या पंजाबचा संघ व मागील सामन्यात मोठा विजय प्राप्त केलेला हैदराबादचा संघ आयपीएलमध्ये आज (शनिवारी) आपापले विजयी अभिमान कायम ठेवण्याच्या उद्देशाने एकमेकांचा सामना करतील. पंजाब व हैदराबादची स्थिती एकसारखीच आहे. या दोन्ही संघांचे 10 सामन्यातून 8 गुण झाले आहेत. मात्र, हैदराबाद चांगल्या धावगतीमुळे गुणतालिकेत आपल्या प्रतिस्पर्धी संघापेक्षा एका पारीने पाचव्या स्थानावर आहे. प्ले ऑफमध्ये आपली जागा पक्की करण्यासाठी या दोन्ही संघांना आपले उर्वरित सामने जिंकावे लागणार आहेत.
पंजाबसाठी स्पर्धेची सुरुवात चांगली झालेली नव्हती. मात्र, मागील तीन सामन्यांमध्येप या संघाने चांगली कामगिरी केली आहे. राहुलच्या नेतृत्वाखालील संघ अव्वल चार संघांमध्ये प्रवेश करण्यासाठी आपले विजयी अभिमान कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. पंजाबची फलंदाजी सुरक्षित हातांमध्ये आहे.

कर्णधार राहुल, मयंक अग्रवाल, ख्रिस गेल व निकोलस पुरन चांगली कामगिरी करत आहेत. मात्र, ग्लेन मॅक्सवेलचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. जिमी निशमच्या आगमनामुळे पंजाबची फलंदाजी व मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखालील गोलंदाजीला काही प्रमाणात मजबुती मिळाली आहे. हैदराबादलाही प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आपले उर्वरित चारही सामने जिंकावे लागतील. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील संघ आता प्ले ऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. जेसन होल्डरच्या समावेशाने हैदराबादची गोलंदाजी मजबूत झाली आहे. या अष्टपैलू खेळाडूने मागील सामन्यात 33 धावांच्या मोबदल्यात 3 गडी बाद केले होते. मात्र, त्यांच्या संघातील युवा खेळाडू प्रियम गर्ग, अब्दुल समद व टी नटराजन यांनी अधिक जबाबदारी घेण्याच गरज आहे.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

धवन अडचणीत; होऊ शकते कारवाई

धवन अडचणीत; होऊ शकते कारवाई
भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज शिखर धवन सध्या अडचणीत सापडला आहे. वाराणसीत नावेतून फिरताना ...

IND vs Aus: असा विचार केला नव्हता की मी ऑस्ट्रेलियामध्ये ...

IND vs Aus: असा विचार केला नव्हता की मी ऑस्ट्रेलियामध्ये डेब्यू करेन टी नटराजन
आयपीएल २०२० मध्ये चमकदार कामगिरी करून नेट गोलंदाज भारतीय संघासह ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर ...

आयपीएल 2021 : 18 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव होण्याची ...

आयपीएल 2021 : 18 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव होण्याची शक्यता
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 18 फेब्रुवारीला ...

भारतीय चाहत्यांना मिळणार क्रिकेट स्टेडियममध्ये प्रवेश

भारतीय चाहत्यांना मिळणार क्रिकेट स्टेडियममध्ये प्रवेश
50 टक्के दर्शकांना प्रवेश देण्यावर विचार

वाचा, त्यामुळे टीम इंडियाला विलीगिकरणातून सूट मिळाली

वाचा, त्यामुळे टीम इंडियाला विलीगिकरणातून सूट मिळाली
शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर टीम इंडियाला विलीगिकरणातून सूट मिळाली आहे. शरद पवार यांनी ...