गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 27 मे 2019 (10:13 IST)

मोदी सरकारचा शपथविधी या दिवशी होणार तर यांना मिळणार मंत्रिपद

भाजपने लोकसभा निवडणूक 2019 मध्ये 542 पैकी 352 जागांवर जबरदस्त  विजय मिळवला आहे. या विजयानंतर नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथ विधी सोहळ्याकडे सर्व देशाचं व जगाचे लक्ष आहे. नरेंद्र मोदी हे  30 मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून, गुरुवारी सायंकाळी 7 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेतील. 
 
यावेळी मोदींसोबत नव्या मंत्रीमंडळातील काही नवे मंत्रीही त्यांच्या मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अयाबद्द्ल राष्ट्रपती भवनाकडून याबाबतची अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे. नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असलेल्या 16 व्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जूनला संपत असून, 3 जूनपूर्वी 17 व्या लोकसभेची नियुक्ती होणार आहे. यावेळी 3 निवडणूक आयुक्त राष्ट्रपतींना भेटून नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांची यादी देणार आहेत. नंतर संसदेच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु होईल. 
 
या सर्व प्रक्रियेनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पंतप्रधानांना शपथ देणार आहेत. पंतप्रधानांच्या शिफारशीने राष्ट्रपतींकडून मंत्र्यांची निवड होईल आणि त्यानंतर त्यांचाही शपथविधी सोहळा होईल. यावेळी स्मृती इराणी, रवी शंकर प्रसाद, नितीन गडकरी, मुख्तार अब्बास नक्वी ,धर्मेंद्र प्रधान ,प्रकाश जावडेकर ,जगत प्रकाश नड्डा  हे शपथ घेतील तर आय्वेली हरदीप पुरी ,के.जे.अल्फोन्सो ,मनोज सिन्हा यांना मंत्रीमंडळातून बाहेर काढले जाणार आहेत. सोबतच शिवसेनेला देखील मंत्रिमंडळात योग्य ते स्थान मिळणार आहे.