प्राणी आणि मानव यांच्यातील मैत्रीच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील. आता आम्ही तुम्हाला उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील एका माकडाची गोष्ट सांगत आाहोत. एक माकड गेल्या 8 वर्षांपासून माणसांसोबत राहत आहे. ते माणसांसोबत इतके मिसळले आहे की त्याचे वागणे माणसासारखे झाले आहे. ते कोणालाही चावत नाही. माकडाचा मालक आकाशच्या म्हणण्यानुसार त्याने त्याचे नाव राणी ठेवले आहे. राणी घरातील कामेही करते.