मराठीतील छोटे 'जय - वीरु'

marathi movie
शालेय जीवनातील दोन अल्लड मित्रांच्या कथेवर आधारित अंड्याचा फंडा या सिनेमाचा ट्रेलर सध्या भरपूर गाजत आहे. बच्चेकंपनी पासून ते थोरामोठ्यांपर्यंत या सिनेमाच्या ट्रेलरने आणि खास करून 'डुबुक डुबुक' गाण्याने मोठी धूम ठोकली आहे. अंड्या आणि फंड्या या सिनेमातील दोन पात्रांना रसिकांनी 'जय-विरू' ची जोडी असे देखील नामकरण करून टाकले आहे. ज्याप्रमाणे 'शोले' च्या जय-विरूची जशी स्कूटर आहे तशीच एक सुंदर सायकल या दोघांचीदेखील चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

अध्यास क्रिएशनचे विजय शेट्टी निर्मित आणि प्रशांत पुजारी तसेच इंदिरा विश्वनाथ शेट्टी सहनिर्मित ह्या सिनेमाचे लिखाण व दिग्दर्शन संतोष शेट्टी यांनी केले आहे.

marathi movie
अंड्या आणि फंड्या अशी या सिनेमातील दोन पात्रांची नावे असून, त्यांच्या मैत्रीचा धम्माल पण तितकाच गूढ फंडा ३० जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.>
अथर्व बेडेकर (अंड्या) आणि शुभम परब (फंड्या) या बालकलाकारांनी ही दोन पात्र साकारली असून. या दोघांची ऑफ-स्क्रिन मैत्रीदेखील अगदी तशीच घनिष्ट आहे. खऱ्या आयुष्यात अथर्व आणि शुभम लहानपणापासूनचे चांगले मित्र असून, त्यांची हि ट्युनिंग चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.
> तसेच आतापर्यंत मराठीतील अनेक चित्रपटात दोन मित्राच्या जोडीला 'जय-विरू' ने नावाजले गेले असेल, पण पहिल्यांदाच बाल कलाकारांची ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन जोडी 'अंड्या चा फंडा'या सिनेमाच्या निमित्ताने सुपर डूपर हिट ठरलेली दिसून येत आहे.

तसेच मराठीत पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून एक युनिक विषय हाताळला जात असल्यामुळे, ह्यात अंड्या नेमका कोणता फंडा मांडणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ मध्ये झळकणार

रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ मध्ये झळकणार
अभिनेता रणदीप हुड्डा नेटफ्लिक्सच्या ‘एक्सट्रेक्शन’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ...

सनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा

सनी लिओनीला लेस्बियन समजायचा तिचा नवरा
बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीने एका खुलासा केला आहे. त्यामुळे सनी पुन्हा एकदा चर्चेला ...

चिंता नको, अजय देवगनने ट्विटरवर केला मोठा खुलासा

चिंता नको, अजय देवगनने ट्विटरवर केला मोठा खुलासा
बॉलिवूडची अभिनेत्री काजोल आणि तिची मुलगी न्यासा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ...

पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका
महाभारत मालिकेचं पुनर्प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्रातून अनेकांनी ...

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत

कोरोना : अक्षयकुमारची 25 कोटींची मदत
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत ...