मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. कुंभमेळा
Written By
Last Modified: बुधवार, 27 जानेवारी 2021 (18:15 IST)

हरिद्वाराचा लक्ष्मण झूला : भारताचे प्रेक्षणीय आणि पर्यटन स्थळ

उत्तरांचल प्रदेशात गंगेच्या काठावर वसलेले कुंभ शहर हरिद्वार मायापुरी नावाने देखील ओळखले जाते. हे स्थळ भारतातील सात पवित्र स्थानांपैकी एक आहे. म्हणजे सप्तपुरीं पैकी एक असलेले हरिद्वार मध्ये बरीच पर्यटन, मनोरंजक आणि प्रेक्षणीय स्थळ आहे .कुंभ शहर असलेले हरिद्वार मध्ये देखील असेच एक प्रेक्षणीय स्थळ आहे ज्याला 'लक्ष्मण झूला' असे म्हणतात.चला त्याच्या बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ या.  
 
1 असं म्हणतात की शेषनागावतार लक्ष्मण जी ह्यांनी ह्याच ठिकाणी ज्यूटच्या दोरीच्या साहाय्याने नदी पार केली. 
 
2 आधुनिक काळात ह्याच्या वर एक पूल बांधण्यांत आले ज्याला लक्ष्मण झूला किंवा झोपाळा असं नाव देण्यात आले. 
 
3 या पुलाच्या पश्चिमेकडे भगवान लक्ष्मणाचे मंदिर आहे तर दुसऱ्या बाजूला प्रभू  श्रीरामाचे मंदिर आहे. 
 
4 या पुलाला सर्वप्रथम स्वामी विशुदानंद ह्यांच्या प्रेरणेने कोलकाताच्या शेठ सुरजमल झुहानुबला ने सन 1889 मध्ये मजबूत तारांनी बांधविले नंतर हे पूल 1924 मध्ये महापुरात वाहून गेले नंतर ह्याला अधिक मजबूत आणि आकर्षक पुलाने बांधले गेले.