सिंहगड किल्ला

sinhagad fort
Last Updated: गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (16:48 IST)
महाराष्ट्राच्या इतिहासात सिंहगडाचे विशेष महत्तव आहे. सह्याद्री टेकडीच्या भालेश्वर सीमेवर बनलेले सिंहगड जमिनीपासून 760 मीटरच्या उंचीवर आणि समुद्रसपाटीपासून 1312 मीटरच्या उंचीवर वसलेले आहे. हा पुण्यापासून सुमारे 30 किमी दक्षिण-पश्चिमेस आहे.
मुघलांसह झालेल्या भयंकर युद्धात मराठांनी या किल्ल्याला आपल्या ताब्यात घेतले. परंतु तानाजी मालसुरे ह्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकून स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी ''गड आला पण सिंह गेला'' हे शब्द उच्चारले होते. त्यानंतर या गडाचे नाव सिंहगड ठेवण्यात आले.


सिहंगड किल्ला कसं जावं -
हा पुण्यापासून 20 किमी च्या अंतरावर आहे. स्वारगेट बस स्थानकापासून सारसबाग किंवा नेहरू क्रीडांगणाकडून जाणाऱ्या या रस्त्याने सिंहगड अंदाजे 35 किमी वर आहे.
स्वारगेट पासून बस ने किंवा खाजगी वाहनाने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते.

प्रेक्षणीय स्थळे-
*दारूचे कोठारे - आत आल्यावर दारूच्या कोठाराची दगडी इमारत दिसते.
*टिळक बंगला - 1915 साली महात्मा गांधी आणि लोकमान्य टिळक ह्यांची भेट इथे झाली.
* कोंढाणेश्वर -हे शंकराचे मंदिर असून यादवांचे कुलदैवत होते.
* श्री अमृतेश्वर भैरव मंदिर- भैरव हे कोळ्यांचे दैवत आहे. यादवांच्या आधी ही कोळ्यांची वस्ती होती. या मंदिरात भैरव आणि भैरवी अशा दोन मुरत्या आहेत भैरवाच्या हातात राक्षसाचे मुंडके आहे.
* देवटाके- हे पाण्याचे टाके आहे ह्याचा वापर पिण्याचे पाणी म्हणून करायचे.
* कल्याण दरवाजा- गडाच्या पश्चिमेचे दार कल्याण दार आहे.
* उदयभानाचे स्मारक- इथे उदयभान राठोडचे स्मारक चिन्ह म्हणून ओळखले जाते.हा उदयभान मुघलांतर्फे सिंहगडाचा अधिकारी होता.
* झुंजार बुरुज- हे सिंहगडाच्या दक्षिणचे टोक आहे उदयभानचा स्मारकावरून पुढे आल्यावर या बुरुजावर येतो. येथून टोपीसारखा राजगड आणि त्याच्याच उजवीकडे तोरणगड दिसतो.खाली पानशेतचे खोरे दिसतात.

पूर्वीकडे लांब पुरंदर दिसतो.
* डोणगिरीचा उर्फ तानाजी कडा- झुंजार बुरुज वरून बाजूच्या पायवाटेने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमे ला आहे.
*राजाराम स्मारक- इथे छत्रपती राजाराम ह्यांची समाधी आहे.
*सुभेदार तानाजीचे स्मारक- अमृतेश्वरच्या मागील बाजूने वर जाऊन डाव्या बाजूस सुप्रसिद्ध सुभेदार तानाजी ह्यांचे स्मारक आहे. दरवर्षी माघ नवमीस येथे मंडळातर्फे सुभेदार तानाजींचा स्मृतिदिन साजरा केला जातो.


यावर अधिक वाचा :

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर

लग्न समारंभातबाबत राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर
लॉकडाऊनमुळे रखडलेल्या लग्न समारंभातबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा ...

पिंपरी चिंचवड शहरातील ‘या’ आठ लसीकरण केंद्रावर मिळणार लसीचा दुसरा डोस
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना लसीचा दुसरा ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना ...

राज ठाकरें उद्धव ठाकरे याच्या पाठीशी लिहिलं PM मोदींना पत्र; पत्रातून मांडल्या ‘या’ महत्त्वपूर्ण मागण्या
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून महाराष्ट्राला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी ...

शहरात सुरु होते भामट्या महिलेचे ‘कार’नामे ! अखेर पोलिसांनी केली अटक…
अहमदनगर शहरात वाहनचालकांकडून लिफ्ट मागून नागरिकांना लुटणारी ‘ती’ भामटी महिला काही जागृत ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची ...

आ.विखे पाटील यांची रेल्‍वेमंत्र्यांकडे विलगीकरण बोगीची उपलब्‍धता करुन देण्‍याची मागणी
अहमदनगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड रुग्‍णांची वाढत चाललेली संख्‍या आणि रुग्‍णालयांमध्‍ये उपलब्‍ध ...

WHO ने जारी केली फूड गाइडलाइन, आहारात सामील करा हे

WHO ने जारी केली फूड गाइडलाइन, आहारात सामील करा हे पदार्थ...
कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा थैमान मांडले आहे. कोरोनाचा नवीन रुप अत्यंत संक्रामक आहे आणि ...

लघुकथा म्हणजे काय?

लघुकथा म्हणजे काय?
"आज समाजोपयोगी साहित्याची रचना करण्याची गरज आहे. समाजातील विसंगती, विद्रुपता, ...

परंपरा जोपासावी लागते आदराने

परंपरा जोपासावी लागते आदराने
परंपरा जोपासावी लागते आदराने, द्यावा लागतो वेळ, आठवावी श्रद्धेने,

ससा तो ससा की कापूस जसा

ससा तो ससा की कापूस जसा
ससा तो ससा की कापूस जसा त्याने कासवाशी पैज लाविली वेगेवेगे धावू नि डोंगरावर जाऊ ही ...

कोरोनाचे सौम्य लक्षणे असतील तर घरात व्हा आयसोलेट, घरातील ...

कोरोनाचे सौम्य लक्षणे असतील तर घरात व्हा आयसोलेट, घरातील लोकांना ठेवा सुरक्षित
रुग्णालयात जागा नाही, डॉक्टरांची कमी, औषधांची आपूर्ती होत नाहीये. अशात जर कोरोनाचे माइल्ड ...