‘वानखेडे'तील दोन जागा गावसकर दाम्पत्यांसाठी राखीव

मुंबई| Last Modified शनिवार, 11 जुलै 2020 (12:32 IST)
भारतीय संघाचे माजी मराठमोळे कर्णधार सुनील गावसकर यांनी शुक्रवारी आपला 71 वा वाढदिवस
साजरा केला. मुंबई क्रिकेट आणि भारतीय संघासाठी दिलेल्या योगदानाबद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशनने सुनील गावसकरांना वाढदिवशी मोठे गिफ्ट दिले आहे. वानखेडे मैदानाच्या प्रेसिडेन्ट बॉक्समध्ये सुनील गावसकर आणि त्यांच्या पत्नीसाठी दोन जागा कायम राखीव ठेवण्यात येणार आहेत.
वानखेडे मैदानावर गावसकर दाम्पत्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागा अद्याप पूर्णपणे तयार झालेल्या नसल्याचे आम्हाला लक्षात आले. एमसीएचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेत या दोन्ही जागा पुन्हा व्यवस्थित तयार करुन गावसकर दाम्पत्यासाठी राखीव करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने
प्रसिद्धीपत्रक जाहीर करत याबद्दल माहिती दिली. मुंबई क्रिकेट असोसिएशनने गरवारे पॅव्हेलिनमध्ये जे.आर. डी. टाटा, लता मंगेशकर आणि सुनील गावसकर यांच्यासाठी पहिल्या रांगेतल्या जागा राखीव ठेवल्या होत्या. मात्र 2011 विश्वचषकादरम्यान वानखेडे मैदानाचे नूतनीकरण करण्यात आले होते. ज्यावेळी या जागा गावसकरांच्या नावे करण्याचे काम प्रलंबित होते.
माझ्या वाढदिवशी एमसीएने मला सर्वात मोठे गिफ्ट दिल्याची प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली. एमसीएच्या वरिष्ठ कार्यकारिणीतले सदस्य नदीम मेनन आणि अजिंक्य नाईक यांनी या कामासाठी पुढाकार घेतला होता. कसोटीत भारताकडून खेळताना 10 हजार धावांचा टप्पा ओलांडणारे पहिले फलंदाज असे अनेक विक्रम गावसकरांनी आपल्या कारकिर्दीत केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर गावस्कर समालोचन आणि वृत्तपत्रांमधून लिखाण करत असतात.


यावर अधिक वाचा :

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! ...

Mi 10i आज 108 मेगापिक्सेल कॅमेर्‍यासह भारतात लॉन्च होईल! किंमत किती असेल जे जाणून घ्या
शाओमी (Xiaomi) 2021 च्या पहिल्या व्हर्च्युअल लाँच इव्हेंटसाठी सज्ज आहे. कंपनी आज (5 ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या ...

New Covid lockdown in England: नवीन कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ब्रिटनमध्ये कडक लॉकडाउन लागू करण्यात आला
बोरिस जॉनसन यांनी लोकांना या घोषणेसह घरी राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनच्या घोषणेनंतर आता ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात ...

लॉकडाउननंतर मद्यपान करणार्‍यांची संख्या दुप्पट, रूग्णालयात 48.5 टक्के रुग्ण पोहोचले
कोरोना साथीच्या चिंतेमुळे एकीकडे लोक स्वत:ला घरातच कैद करू लागले. दुसरीकडे, लोकांनीही ...

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ
राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार्‍या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास १५ डिसेंबरपासून ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची ...

गजबजलेल्या रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या
मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून २२ वर्षीय तरुणीची हत्या करत ...

आयपीएल 2021 : 18 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव होण्याची ...

आयपीएल 2021 : 18 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव होण्याची शक्यता
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 च्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 18 फेब्रुवारीला ...

भारतीय चाहत्यांना मिळणार क्रिकेट स्टेडियममध्ये प्रवेश

भारतीय चाहत्यांना मिळणार क्रिकेट स्टेडियममध्ये प्रवेश
50 टक्के दर्शकांना प्रवेश देण्यावर विचार

वाचा, त्यामुळे टीम इंडियाला विलीगिकरणातून सूट मिळाली

वाचा, त्यामुळे टीम इंडियाला विलीगिकरणातून सूट मिळाली
शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर टीम इंडियाला विलीगिकरणातून सूट मिळाली आहे. शरद पवार यांनी ...

India vs England: भारतीय संघाला मोठा झटका, रवींद्र जडेजा ...

India vs England: भारतीय संघाला मोठा झटका, रवींद्र जडेजा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर
इंग्लंडविरुद्धच्या घरेलू कसोटी मालिकेत भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा बाहेर झाला आहे. ...

INDvsAUS: शशी थरूर यांनी टीम इंडियाच्या विजयावर ट्विट करत ...

INDvsAUS: शशी थरूर यांनी टीम इंडियाच्या विजयावर ट्विट करत खास शब्दासाठी ट्विट झाले वायरल
भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत टीम इंडियाने शानदार ...