शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Updated : शुक्रवार, 28 एप्रिल 2017 (14:54 IST)

कुटूंबाला कुटूंबाशी जोडणारे- सूर्यशिबीर

सध्याच्या इंटरनेटच्या जगात समोरासमोर बसून एकमेकांशी बोलायला वेळ नाही, ही सद्यस्थिती आहे. मोबाईल, इंटरनेटमध्ये व्यक्ती इतक्या गुंग झाल्या की मनं मनापासून वेगळी होताना दिसत आहे. या सगळ्यावर उपाय म्हणजे आता सगळ्यांनी एकत्र वीकएण्ड साजरा करणं होय. हा वीकएण्ड एकत्र घालवण्यासाठी वरसगाव धरणाशेजारी असलेलं सूर्यशिबीर हे उत्तम ठिकाण आहे.
 
पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर वरसगाव धरणाच्या शेजारी वसलेल्या टुमदार जागेतलं सूर्यशिबिर. वयाच्या साठीपासून ते वय वर्षे सात असलेल्या छोट्याश्या मुलांपर्यंत सगळ्यांच्या मनासारखी सोय असणारं सूर्यशिबीर हे मनांना एकमेकांशी जोडणारा दुवा आहे, असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. सूर्यशिबीरात एका वेळी दोन ते पन्नास जण रहाण्यासाठी विविध प्रकारच्या खोल्या बांधल्या आहेत. खोलीमध्ये रहाणा-या व्यक्तींच्या संख्येनुसार खोल्यांमध्ये सोय करण्यात आली आहे. प्रत्येक खोलीला सूर्याचे नाव देण्यात आले आहे. सूर्यशिबीराचे वैशिष्ट्य म्हणजे हा सर्व प्रकल्प केवळ सूर्यउर्जेवर सुरू आहे.
 
वयाच्या सातव्या वर्षी मुलांना काय लागतं, असा जर प्रश्न केला तर मातीत खेळणं, पाण्यात खेळणं आणि इकडे तिकडे हुंदडणं. रेन डान्स, धबधब्यात खेळणं, फिरायला प्रशस्त जागा आणि धम्माल मस्ती करण्यासाठी सूर्यशिबीर मस्त आहे. त्याचबरोबर पक्ष्यांना स्वत:च्या हातातून खायला भरवणं हा आनंद मुलांसाठी अविस्मरणीय आहे. मुलांच्या वाढत्या वयात कुठल्याही प्रकारची आडकाठी न होता त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे खेळण्याचा आनंद देऊन त्यांचा मानसिक आणि शारिरीक विकास करण्याचं काम सूर्यशिबीर करत आहे.
 
तेरा ते तेवीस हे तरुणाईचं अल्लड वय. मनाचे बांध किंवा पाश सोडून वा-याप्रमाणे वहाण्याचं हे वय. प्रेम आणि निसर्ग यांची तुलना करत जगण्याचं हे वय. त्यामुळे पानं, फुलं आणि पक्षी यांच्या सानिध्यात जर वेळ घालवण्यासाठी इथे एक फेरफटका मारायलाच हवा. मुलांना आपापल्या मर्जीप्रमाणे मित्रांच्या संगतीत वेळ घालवत भविष्याचा विचार करण्यासाठी एकदा तरी इथे यायलाच हवं. इथल्या एडव्हेंचर पार्कचा अनुभव एकदातरी तरुणाईनं घ्यायलाच हवा.
 
पती आणि पत्नी हे नातचं काही वेगळं असतं. या नात्यामध्ये कौटुंबिक जबाबदा-याबरोबंर गरज असते एकमेकांसमवेत वैयक्तिक वेळ घालवण्याची, मन मोकळं करण्याची. ज्यासाठी गरज असते एकांताची. सूर्यशिबीरातल्या प्रत्येक खोल्या या निसर्गाच्या सानिध्यात आहेत. सूर्यप्रकाश, चंद्राचं शीतलं चांदणं, फुलंचा मंद सुवास आणि पक्ष्यांची किलबिल यांसमवेत आपल्या भूतकाळातले आनंदाचे क्षण आणि भविष्यातल्या आनंदाच्या गोष्टी ठरवण्यासाठी तुम्हाला निसर्गाची साथ हवीच. साथीला योग्य आहार आणि संध्याकाळच्या संधीप्रकाशातला एक कप चहा तुम्हाला उर्वरित आयुष्यात नक्कीच आनंदी ठेवू शकेल, यात शंकाच नाही. त्यामुळे आपली नाती दृढ आणि घट्ट करण्याचे बंध तयार करण्यासाठी एकमेकांना वेळ देण्यासाठी सूर्यशिबीरासारखे जागा नाही.

कौटुंबिक जबाबदा-यातून बाहेर पडल्यानंतर केवळ एकमेकांसाठी जगण्याचे वय म्हणजे रिटायर्डमेंट. उर्वरित आयुष्यात खरोखऱीच जर निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर सूर्यशिबीरात जाणे योग्य. दिवसा सूर्यकिरणांच्या जोडीनं तर संध्याकाळी पाण्याच्या खळखळ आवाजाबरोबर मन मोकळं करत आपल्या जोडीदाराच्या साथीत वेळ व्यतीत करण्यासाठी सूर्यशिबीरासारखे ठिकाण नाही. एक दिवसापासू ते आठ दिवसापर्यत तुम्ही येथे राहून आयुष्याचा आनंद लुटू शकता.  
 
सात ते सत्तर आणि पुढे अशा प्रत्येक वयोगटासाठी सूर्यशिबीर हा पर्याय उपबलब्ध आहे. घरातल्या एकमेकांना समजून आनंद लुटण्यासाठी आणि बिझी श्येड्यूलमधून सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी सूर्यशिबीरला भेट द्या आणि पावसाळ्यातही सूर्यशिबीरामध्ये एन्जॉय करण्यासाठी सज्ज व्हा.
 
तृप्ती पारसनीस