काख दुर्गंध दूर करण्याचे घरगुती उपाय  
					
										
                                       
                  
				  				  
				   
                  				  आपल्यालाही अधिक घाम फुटत असला आणि त्यामुळे आपण हात उंच करायला घाबरत असाल तर असे आपण एकटे नाही. आणि ही दुर्गंध मिटवण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. परंतु हे उपाय सांगण्यापूर्वी ही दुर्गंध का येते हे जाणून घेणे आवश्यक आहे. ही दुर्गंध घामाची नसून जेव्हा घाम आणि बॅक्टीरिया मिळतात तेव्हा येते.
				  
	बॅक्टीरिया गरम आणि नरम जागेवर पसरतात आणि घामामुळे आपल्या काखेत बॅक्टीरिया वाढू लागतात. आपल्या शरीरात आढळणारे बॅक्टीरिया अत्यधिक कॅफीन युक्त पेय पदार्थांचे सेवन, हार्मोन्स मध्ये असंतुलन, किशोरावस्था किंवा जेनेटिकली वाढतं. आता जाणून घ्या यापासून वाचण्याचे उपाय: 
				  													
						
																							
									  
	 
	लिंबाचा रस
	लिंबात आढळणारे सिट्रिक ऍसिड बॅक्टीरियाला मारतात, याने त्वचेवरील संतुलन परत येतं आणि त्वचा उजळते. ½ कप लिंबाच्या रसात 1 कप स्वच्छ पाणी मिसळा. हे घोळ एका स्प्रे बाटलीत टाका. याचा वापर आपल्या काखेत एंटीपर्स्पिरेंट प्रमाणे करा. या स्प्रेने आठ तासापर्यंत दुर्गंधीपासून मुक्ती मिळेल.
				  
				  											 
						
	 
							
							 
							
 
							
						
						 
																	
									  
	गवत
	गवत एक नैसर्गिक सूक्ष्म जंतूचा नाशक आहे ज्याने काखेची दुर्गंध दूर होते. 2 चमचे गवताचा रस 2/4 कप पाण्यात मिसळा. या घोळने काख धुवा. शरीराची दुर्गंध रोखण्यासाठी आपण या रसाचे सेवनही करू शकता.
				  
				  
	अॅप्पल सीडर व्हिनेगर
	अॅप्पल सीडर व्हिनेगर मध्ये अँटीऑक्सीडेंटस आणि नैसर्गिक अॅसिड आढळतं. हे बॅक्टीरियाला नष्ट करतं. एक स्प्रे बाटलीत एक चमचा अॅप्पल सीडर व्हिनेगर आणि ½ कप पाणी मिसळा. हे मिश्रण एका बाटलीत टाका. याला एंटीपर्स्पिरेंट प्रमाणे वापरा. वापरण्यापूर्वी बाटली हालवून घ्या.
				  																								
											
									  
	पेपरमिंट ऑइल
	पेपरमिंट मध्ये आढळणारे नैसर्गिक मेन्थाल शरीरातून येणार्या दुर्गंधीला दूर करतात तसेच याने काखेत होणार्या पुरळांपासून मुक्ती मिळते. आपल्या हातात ऑर्गेनिक पेपरमिंट ऑइलचे काही थेंब घेऊन काखेत लावा. हे लावल्यानंतर खाज सुटत असेल तर लगेच धुऊन टाका.
				  
				  
	टी ट्री ऑइल 
	टी ट्री ऑइल मध्ये अँटी बॅक्टीरियल, अँटी सेप्टिक गुण आढळतात. याचसोबत त्यात शक्तिशाली अँटीऑक्सीडेंटसही असतात जे दुर्गंध पसरवणारे बॅक्टीरिया नष्ट करतात. घाम येणार्या ग्रंथींनी नियमित करत आणि कोणत्याही  प्रकाराची सूज कमी करतं. या तेलाचे काही थेंब आपल्या हातावर घेऊन काखेत लावा. दुर्गंध दूर करण्यासाठी हे दररोज वापरू शकतात.