beauty tips in marathi, legs in marathi, beauty, legs, foot, shoes, sandil in marathi, | पायांसाठी काय करू?
WD
पाय हा देखील शरीराचा एक अनिवार्य आणि महत्त्वपूर्ण भाग आहे आणि जितकी काळजी आपण शरीराच्या इतर भागांची घेतो, तेवढीच काळजी आपण रोजच्या रोज पायांकडे थोडेसे लक्ष पुरवले तरी ते पुरेसे असते. मुख्यत्वे पायांशी निगडीत समस्या असल्यास त्याकडे विशेष आणि ताबडतोब लक्ष द्यायलाच हवे. अनेक प्रकारच्या सवयींबुळे पायांचे विशेष नुकसान होऊ शकते. काही महत्त्वाच्या सूचनांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे.
पादत्राणे
पायांची योग्य काळजी घेतांना सगळ्यात महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे सुयोग्य पादत्राणांची निवड. पायांना सर्वाधिक त्रस्त करणारा प्रकार म्हणजे पायाच्या आकारानुरुप आणि आरामदायी नसलेली पादत्राणे. शक्यतो सॉफ्ट लेदर किंवा तस्सम मुलयम मटेरियलपासून बनवलेल्या पादत्राणांची निवड करावी. हार्ड लेदर किंवा टणक मटेरिलयपासून बनवलेली, ज्यामुळे पाय अवघडतात अशी पादत्राणे वापरू वापरू नये.
पायांसाठी जोडे खरेदी करताना नेहमी योग्य आकाराच्या जोड्यांची निवड करा. असे करताना जोडे घातल्यानंतर पायाची बोटे मोकळी हलायला हवीत, ती चेपली जायला नकोत.
WD
आठवड्यातून किमान एकदा (सुट्टीच्या दिवशी) जोडे किंवा चपला थोड्या शॅम्पूच्या पाण्याने धुवून लगेच पुसून घ्यावे व उन्हामधे वाळवून घ्यावेत. अगदी बारीक, पेन्सील हिल्सच्या चपला वापरणे शक्यतो टाळावे. यामुळे पायाच्या मसल्सवरील ताण वाढून ते दुखावले जाण्याची शक्यता असते.
मोजे
प्रत्येकाचे स्वतंत्र मोजे असावेत. एकमेकांचे मोजे वापरल्याने त्वचारोगांचा प्रसार होऊ शकतो.
मोज्यांची निवड करतानाही थोडे चिकित्सक असायला हवे. खूप घट्ट इलॅस्टीक असलेले मोजे वापरणे शक्यतो टाळा.
सिंथेटिक धाग्यांपासून तयार होणारे मोजे आकर्षक जरी दिसत असले तरी घाम शोषून घेण्याचे कार्य ते करू शकत नाहीत. शिवाय सिंथेटिक मोजे वापरल्याने पायांना घाम येण्याचे प्रमाणही वाढते.
एक दिवस वापरलेले मोजे पुन्हा दुसर्या दिवशी वापरू नयेत. मोजे काढल्यानंतर स्वच्छ धुवून वाळवून घ्यावेत.
शक्य तितके साधे आणि कॉटनचे मोजे वापरण्याचा प्रयत्न करावा.
पायांच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी पादत्राणे आणि मेजो यांची काळजी घेणे अतिशय आवश्यक असते.
