नयन तुझे जादूगार
डोळे हा शरीराचा नुसता अवयव नाही तर तर सौंदर्याचाही एक मापदंड आहे. त्यामुळेच डोळ्यावरूनही कमलाक्षी, हरिणाक्षी अशा उपमा दिल्या जातात. त्यामुळे या डोळ्यांचे सौंदर्य राखणे गरजेचे आहे. त्यासाठी त्याची आवश्यक ती काळजीही घ्यायला हवी.
अ जीवनसत्व डोळ्यांच्या पोषणात महत्त्वाची भूमिका बजावते. या जीवनसत्वाअभावी रातांधळेपणा आणि इतर अनेक विकार उद्भवू शकतात. ते टाळण्यासाठी ताज्या आणि हिरव्या पालेभाज्या, लोणी, दूध, टोमॅटो, गाजर, पपई, कॉड लिव्हर ऑईल यांचा समावेश आहारात केला पाहिजे. डोळ्यांचा थकवा कमी करण्यात हे पदार्थ सहाय्यभूत ठरतात.
डोळ्यांचे सौंदर्य कमी करणारे किंवा त्याला बाधा आणणारे अनेक घटक आहेत. पण नेहमीचा ताण हेही एक प्रमुख कारण आहे. सध्याच्या काळातील पिढी तासंतास संगणकासमोर बसून असते. त्याशिवाय पर्यायही नाही. पण त्यामुळे डोळ्यांवरचा ताण वाढू शकतो. तो कमी करण्यासाठी थोडा वेळ बाहेर पाहिले पाहिजे. सतत नजर संगणकावर नको. एकूणच डोळ्यावर येणार्या ताणामुळे काळी वर्तुळे वाढतात. या वर्तुळामागची कारणे काय याचाही शोध घेतला पाहिजे.
1. डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे अनेकदा गंभीर आजाराची सुरवात असू शकतात.
2. जीवनसत्वाचा अभाव, पोषक पदार्थांचा असमतोल यामुळेही काळी वर्तुळे येऊ शकतात.
3. अनियमित जेवण, झोप आणि ताणतणाव, मानसिक अस्वस्थता काळ्या वर्तुळांना कारणीभूत ठरू शकते.
4. रक्तातील हिमोग्लोबीन कमी झाल्यास येणारा अशक्तपणा डोळ्यांभोवतीच्या काळ्या वर्तुळांचे एक कारण असते.
5. स्त्रियांमध्ये बाळंतपण, गर्भपात आणि हार्मोन्समधील असमतोल हे देखील काळे वर्तुळांचे कारण असू शकते.
हल्लीची रसायने वापरून तयार करण्यात आलेली सौंदर्यप्रसाधनेही डोळ्यांना त्रासदायक ठरू शकतात. एलर्जी निर्माण होण्याची शक्यता असते. डोळ्यांभोवती सूज येणे, खाज सुटणे हेही प्रकार त्यामुळे होतात. यासाठी चांगल्या दर्जाची सौंदर्य प्रसाधने वापरावीत. डोळ्यांभोवती क्रीम, लेप हळूवार लावावा. जोरात रगडू नये. डोळ्याभोवतीची त्वचा कोरडी, काळवंडलेली आणि सुरकुतलेली दिसत असल्यास या त्वचेमध्ये मॉईश्चर कमी असल्याचे समजावे आणि अशा अवस्थेत सी रीड जेली, बदामापासून तयार केलेले क्रीम लावावे.
नयन तुझे जादूगार ही अनुभूती येण्यासाठी ते आकर्षक दिसायला हवेत. त्यासाठी भुवयांकडेही लक्ष दिले पाहिजे. आडव्या, तिडव्या वाढलेल्या भुवया सौंदर्याला बाधक ठरतात. म्हणून थ्रेडिंग करून किंवा प्लकरच्या सहाय्याने मुवयांच्या आजूबाजूचे केस काढून टाकून भुवयांना आकार द्यायला हवा. डोळ्यांचे सौंदर्य वृद्धिंगत करण्यासाठी आय मेकअपही केला जातो. परंतु असा मेकअप तज्ज्ञ व्यक्तींकडून शिक्षण घेऊश्र मगच करणे अत्यंत आवश्यक आहे. आय शॅडोज, आय लायनर, मस्करा इत्यादी अनेक सौंदर्य प्रसाधनांचा उपयोग करून डोळ्यांचे सौंदर्य खुलवता येतो.
|