1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. फॅशन

सौंदर्यवृद्धीचे चित्रविचित्र उपाय

सौंदर्यवृद्धीचे चित्रविचित्र उपाय
क्लिओपात्रा म्हणे सौंदर्य राखण्यासाठी गाढवाच्या दूधाने स्नान करायची. कोणी सांगावे कदाचित हे खरेही असेल. कारण आधुनिक जगातील क्लिकोपात्रासुद्धा सौंदर्य राखण्यासाठी असे चित्रविचित्र उपाय करत आहेत. वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय रहाणार नाही.

NDND
हॉलिवूडची अभिनेत्री वेनिथ पाल्ट्रो चेहर्‍यावर सापाचे विष लावते म्हणे. त्यामुळे आता सापाच्या विषाची क्रीमही बाजारात आलीय. प्रसिद्ध पॉप गायिका मॅडोनाची तर्‍हा आणखी निराळी. आपला चेहरा ती मृत समुद्रातून मागविलेल्या पाण्यानेच धुते. तिच्या चिरतरूण चेहर्‍याचे रहस्य हे आहे. फ्रेंडस या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री जेनिफर एनिस्टन सटिन चेहरा स्वच्छ राखण्यासाठी डबाबंद ऑक्सिजनचा फवारा उडवते.

एवढं वाचूनच धक्का बसला असेल तर थांबा. बीयर, शॅंपेन, कॉफी आणि चॉकलेट हेही केवळ हॉलीवूड नव्हे तर बॉलीवूडच्या अभिनेत्रींच्या सौंदर्यप्रसाधनांचा एक भाग आहे. भारतातही अनेक स्त्रिया बीयरने केस आणि शॅंपेनने चेहरा धुतात. शरीरावर चॉकलेटचा थर लावतात. रात्री उरलेले दूध किंवा ऑस्ट्रेलियाच्या एमू पक्षाचे तेल सौंदर्यवृद्धीसाठी महत्त्वाचे आहे.

(नई दुनिया)
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा