saree in marathi, beauty article, bangali sari in marathi, sexi in marathi | सदाबहार वेशभुषा साडी
WD |
फॅशनचा सर्वांत महत्वाचा भाग वेशभुषा असून कित्येक नवीन प्रकारच्या वेशभुषा नित्य बदलत असतात तर काही पारंपारिक वेशभुषा नित्य टिकून असतात. त्यातील एक आहे साडी. साडी पारंपारिक असूनही ती सदाबहार आहे. विशेष म्हणजे ही अशी वेशभुषा आहे, जिचा आकार एक असूनही ती परिधान करण्याच्या मात्र अनेक पद्धती आहेत. जसे नऊवारी साडी, सरळ पदराची साडी, उलट्या पदराची साडी, बंगाली साडी, लहान साडी, पिनअप साडी, एकेरी पदराची साडी इत्यादी.
साडीमध्ये स्त्रीचे सौंदर्य अधिकच खूलून दिसते. स्त्री सडपातळ असो किंवा जाड. साडी प्रत्येक स्त्रीला शोभून दिसते. साडीच्या जशा अनेक पद्धती आहेत तशा अनेक डिझाइनही आहेत जसे साधी साडी, डिझाइनर साडी, बांधणी साडी, काठ पदराची साडी, जरीची साडी, तार्यांची साडी, इत्यादी.
पैठणी साडी तर साड्यांची महाराणी मानली जाते. त्यावरचे बारीक जरतारी नक्षीकाम, तसेच रंगसंगती प्रत्येक स्त्रीच्या मनास भुरळ घालणारी असते. आजकाल साडीवर अनेक पद्धतीचे नक्षीकाम करण्याची फॅशन आहे. जसे ऑफिशियल वापरासाठी किंवा नित्य उपयोगासाठी कॉटनच्या साडीवर फेब्रिक रंगाचे नक्षीकाम करु शकता. साडीवर पॅचवर्क करुनही आपण साडीची शोभा वाढवू शकता.
साध्या साडीच्या किनारीवर लेस लावून तसेच भरतकाम करुन तिचे सौंदर्य खूलवू शकता. हल्ली तर मशीनच्या सहाय्याने साडीवर एम्ब्रॉडरीचे छान नक्षीकाम करुन मिळते. सण समारंभासाठी साडीवर तार्यांचे, जरीचे, मोत्यांचे, काचाचे, क्रिस्टल मोती तसेच स्टोनचे वर्क करुन साडी भरजरी करु शकता.
संध्याकाळच्या समारंभात तार्यांचे किंवा मोत्यांचे नक्षीकाम केलेली साडी आपल्या सौंदर्यात भरच घालेल.
