अशी सजवा फुलदाणी
|
* पुष्पसज्जा करताना दीर्घ काळ ताजी राहतील अशीच फुले निवडा. फुले हाताने न तोडता धारदार चाकूने तोडा.
* फुले निवडताना फुलदाणीचा आकार लक्षात घ्या. फुलदाणी लहान असेल तर लहान दांडीची फुले निवडा व मोठी असतील तर मोठ्या दांडीची फुले निवडा. पसरट व मोठ्या आकाराच्या फुलदाणीसाठी पसरट व मोठ्या आकाराची फुले निवडा.
* फिक्या रंगाच्या फुलांसाठी फिक्या रंगाची पाने व गडद रंगाच्या फुलांसाठी गडद रंगाची पाने वापरा.
* एकाच वेळी जास्त रंगाची फुले ठेवण्यापेक्षा दोन-तीन रंगाची फुले ठेवा.
* फुले एकाच दिशेला व पाने एकाच दिशेला येणार नाहीत याकडे लक्ष द्या.
|
* फुलदाणीच्या पाण्यात थोडी साखर, मीठ व डेटॉलचे काही थेंब टाका. यामुळे फुले जास्त काळ ताजी राहतात.
* तांब्याच्या फुलदाणीत फुले लवकर कोमेजत नाहीत. तांब्याची फुलदाणी नसेल तर फुलदाणीत तांब्याची नाणी टाका.
* सुगंधी फुलांना 10 मिनिटे थंड पाण्यात ठेवून नंतर फुलदाणीत सजवा. यामुळे सुगंध जास्त काळ टिकतो.
