ब्यूटी ट्रीटमेंट घ्या पण.....
|
ब्युटीशियन, डर्मेटॉलॉजिस्ट तसेच कॉस्मॅटॉलॉजिस्टची वाढती संख्या पाहता सुंदर दिसण्याची व चिरतरूण राहण्याची क्रेझ किती वाढली आहे हे दिसून येते. पण खूप कमी पार्लर किंवा ब्युटी थेरपिस्ट सर्व सावधगिरी व नियम पाळतात. त्यामुळे धोका अजून वाढतो आहे. या चिरतारूण्याचा फायदा होऊ लागल्याने या टेक्निक वापरणार्यांचा पूर आला आहे. या थेरपिस्ट फक्त सिनेतारका, सेलिब्रेटीज आणि मॉडेल्सपर्यंतच मर्यादित नसून शाळेत जाणार्या मुलींपासून ते मध्यमवयीन गृहीणींपर्यंत तसेच पुरूषांमध्येही लोकप्रिय आहेत. त्यामुळे गल्लीबोळात ही ब्युटीपार्लस् आणि स्किन केअर क्लिनिक निघाली आहेत.
|
|
या गोष्टींकडे लक्ष द्या....
* त्वचेवर उपचार करताना ब्युटीशियन योग्य प्रशिक्षण घेतलेली असावी. छोट्या बाबतीत सुध्दा.
* ट्रिटमेंटपूर्वी ब्युटीशियनला हात धुण्यास तसेच ग्लोव्हज घालण्यास नक्की सांगा. तसेच वापरातल्या वस्तू (कंगवा, टॉवेल, वॅक्सींग स्ट्रीप) बदलण्यास सांगा.
* कोणत्याही ट्रिटमेंटपूर्वी पॅच टेस्ट पक्की करा. त्यामुळे तुमच्या त्वचेचा प्रकार कळतोच पण त्वचेवर होणार्या प्रतिक्रियाही कळतात.
* स्वस्तात मिळते आहे म्हणून ती ट्रीटमेंट न करता योग्य नियमांनीच प्रयोग करा.
* स्वत: कोणताही प्रयोग करण्यापासून लांब रहा. अर्थात ज्या गोष्टींची पूर्ण माहीती आहे त्याच आजमावून बघा.
