Widgets Magazine
 

घरगुती क्रिम-साय


beauty
NDND
थंडीचा परिणाम ओठांवर व चेहर्‍यावरील कोरडेपणातून स्पष्टपणे जाणवतो. या काळात घरी व्हॅसलीन, ग्ल‍िसरीन, कोल्ड क्रिम यापैकी काही ना काही ठेवावेच लागते. सकाळी आंघोळ केल्यावर क्रिम लावले नाही तर एक दोन तासातच परत त्वचा ओढली जाते आणि खरखरीत कोरडीही होते. बाजारातल्या नवनवीन येणार्‍या क्रिमचा वापर तर नेहमीच केला जातो. पण नेहमीच घरात उपलब्ध असणारे क्रिम म्हणजेच साय कधीतरी वापरून पहा.

* एक चमचा साय व लिंबाचा रस एकत्र करून रोज चेहर्‍यावर व ओठांवर लावल्यास ते फुटत नाही.
* थोडी साय व एक चमचा डाळीचे पीठ असे घरगुती उटणे साबणाला चांगला पर्याय आहे. त्यामुळे त्वचा मुलायम होते.
* मुलतानी माती बारीक करून सायीत मिसळून चेहर्‍यावर तसेच कोपर्‍यावर लावल्यास रंग उजळतो.
* तीन चार बदाम आणि दहा बारा देशी गुलाबाच्या पाकळ्या वाटून त्यात एक चमचा साय मिसळून ते मिश्रण चेहर्‍यावर लावल्यास चेहर्‍यावरच्या सुरकूत्या आणि काळे डाग नाहीसे होतात.
* सायीत समुद्र फेसची बारीक पावडर मिळवून लावल्यास चेहर्‍यावरची मुरमे बरी होतात.
* मोसंबी किंवा संत्र्याची सालं वाटून त्यात साय मिसळून त्याचा लेप लावल्यास त्वचा मुलायम व स्वच्छ होते.
* एक चमचा साय व एक चमचा सफरचंदाचा रस एकत्र करून फेटून हलक्या हाताने चेहर्‍यावर मालीश केल्यास चेहर्‍याचा रंग उजळतो.
* सायीचा उपयोग औषधासारखाही होतो.
* थंडीच्या दिवसात खोकल्याचा त्रासही वाढतो. अशा वेळी अर्ध्या वाटी सायीत एक चमचा नारळाचा किस पाच मोठे वेलदोडे (पावडर) तसेच 10 मिरे भरडून बारीक गॅसवर परतून गरम करावे व झोपण्यापूर्वी गरमगरम खावे. थोडे दिवस असे केल्यास कोरडा खोकला बरा होतो.
* काशाच्या किंवा पितळी ताटलीत दोन चमचे ताजी साय थोडे पाणी घालून खूप फेटावे. साय हलकी होऊन लोण्यासारखी मऊ होईल. त्यात एक कापराची वडी बारीक करून मिसळावी. फोड, जखम यावर हे मलम लावल्यास फायदा होतो. हेच मलम लहान मुलांच्या टाळूवर घालून हलक्या हाताने मालीश केल्यास टाळू लवकर भरते व गरमीच्या दिवसात डोळ्याला थंडावा मिळतो.

यावर अधिक वाचा :  
Widgets Magazine

सखी

पार्टीसाठी स्टायलिश ड्रेस

पार्टीमध्ये घालण्यासारखा हा सोबर कलरचा ड्रेस आहे. विशेषतः संध्याकाळच्या पार्टीसाठी सूट तो ...

बुरशीचा संसर्ग टाळण्यासाठी

पावसाळयात आंघोळीसाठी काही विशिष्ट वनौषधींचाही वापर करावा, पाण्यात कडूलिंबाची पाने आणि ...

नखं साफ करण्याचा सोपा उपाय

नखं साफ करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे साधारण गरम पाण्यात हात पाच-सहा वेळा साबणाने स्वच्छ ...

केसात जर कोंडा असेल तर

केसात जर कोंडा असेल तर केसांना सफरचंदाचा रस लावावा, त्यामुळे कोंडा दूर होण्यास मदत होईल.

Widgets Magazine

Cricket Scorecard

Widgets Magazine

आज-काल

'ए मेरे वतन के लोगों...'

लतादीदींसमवेत १ लाख लोक गाणार?

इंग्लिश बोला, पैसे कमवा

भाषिक अस्मितेच्या नावाने राजकीय नेत्यांनी कितीही बोंबा मारल्या तरी कमाईच्या बाबतीत विश्वभाषा ...

नवीनतम

फार्मसी क्षेत्रात करिअर

फार्मसी म्हणजे फक्त औषधांचं दुकान नव्हे. संशोधन क्षेत्रातही फार्मसीचं खूप मोठं योगदान आहे. फक्त ...

Try This : पाकसल्ला

भाजा फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजाचा तुकडा त्याबरोबर ठेवा. दोन-तीन दिवसानंतर स्पंजाचा तुकडा ...

Widgets Magazine