लग्नाच्या अगोदर वर-वधू यांना हळद का लावतात हे माहिती आहे? कारण हळद त्वचेला तजेला देते. त्वचा निरोगी ठेवते. वैदिक काळापासून ही प्रथा प्रचलित आहे. वधू-वरांना लग्नाच्या ५-६ दिवसा अगोदर तेल व हळद लावतात, तशीच आता मायनर कॉस्मेटिक सर्जरीसुद्घा लग्नाच्या काही महिने आधी केली जाते. आडवे तिडवे नाक अथवा बटबटीत ओठांव्यतिरिक्त त्वचेला चमकदार बनवण्यापासून नको असलेले केस आणि विचित्र नखांची रचना आपण बदलू शकतो.
आधी प्लॅनिग करा त्वचेला चमकदार बनविण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. आपल्याला एक्ने असेल तर एंटिबायोटिक्स द्यावे लागेल. ब्लू लाइट लेझर ट्रिटमेंट घ्यावी लागेल. त्या व्यतिरिक्त स्किन पील, स्किन पॉलिशिंग व एक्ने क्लीन अप करावे लागेल. तुमच्या चेहऱ्यावर मुरमे असतील किंवा त्वचा काळ्या रंगाची असेल तर घाबरण्यासारखे काही नाही. कारण स्किन पीलने आपण सहा दिवसात उजळलेली त्वचा प्राप्त करू शकता.
नको असलेल्या केसांपासून सुटका आता नको असलेल्या केसांसाठी शेव्हिंग किंवा वॅक्सिंगची गरज नाही. ते आपण लेजरने सुद्घा काढू शकतो. जास्त काळासाठी ते काढायचे असतील तर ही ट्रिटमेंट आपल्या बऱ्याचदा करावी लागेल. तसे लग्नाचा काही दिवस अगोदर ही ट्रिटमेंट घेतल्यास पुढील बराच काळ आपण नको असलेल्या केसांपासून सुटका करून घेऊन शकता.
बोटॉक्स कॉस्मेटिक तणावामुळे आपल्याला नाक उडविण्याची सवय लागली असल्यास तुमच्या कपाळावर दोन रेषा पडतात. अनकेदा त्या कायमस्वरूपी रहातात. त्या दूर करण्यासाठी बोटॉक्सचे इंजेक्शन घ्यावे लागते. लग्नाअगोदर तणावापासून मुक्ती मिळविण्यासाठी हे इंजेक्शन घेण्यात येते. लग्नाच्या दोन आठवडे अगोदर ही ट्रीटमेंट घेतली तर तुम्ही लग्नापर्यंत तणावमुक्त दिसाल.
सुपरफेशियल पील स्किन पॉलिशिंग आणि लाइट केमिकल पीलच्या सेवनाने आपली त्वचा चमकदार आणि सुरकुत्यांरहीत दिसेल. म्हणजे लग्नाच्या दिवशी तुमची त्वचा मेकअपसाठी पूर्णपणे तयार झालेली असते. त्वचेवर कोणताही डाग रहाणार नाही. चेहऱ्याची पील करताना मान आणि खांद्याच्या भागांना विसरू नका. रखरखीत त्वचेवर पील उपयुक्त असल्याचे सिद्घ झाले आहे.
हात, नखे आणि केसांची निगा राखण्यासाठी वधू-वरांनी लग्नाच्या कमीत कमी १ महिना आधी पेडिक्योर, मेनिक्योर आणि केसांची ट्रिटमेंट घ्यायला पाहिजे. फाटलेल्या नखांसाठी कृत्रिम नखांपासून एक्रेलिक्स आणि जेलचा वापर करता येतो. मग आता वेळ न घालवता कॉस्मेटिक सर्जरीसाठी स्वतःला तयार करा.
|