इको फ्रेंडली मेकअप
ND
NDप्राचीन काळात महिला या जमीनतून निघणार्या चकाकरार्या दगडांची पावडर तयार करून ती चेहर्यावर लावत होता. सध्याचे युग हे फॅशनेबल झाले आहे. या फॅशनमध्ये प्रत्येक मिनिटाला परिवर्तन घडून येत आहे. अत्याधुनिक 'मिनरल मेकअप' सध्या महिलावर्गाला आकर्षित करत आहे. हा मेकअप तयार करण्यासाठी लागणारी सामग्रीमध्ये खनिज पदार्थांचा उपयोग केला जात असतो.
ND
NDप्राचीन काळातील जमिनीत चमकणार्या दगडांचा उपयोग आजही सौंदर्यप्रसाधने तयार करणार्या कंपन्या करत असल्याचा दावा विशेषज्ज्ञानी केला आहे. त्यांच्यानुसार काही कंपन्या आधुनिक सौंदर्य प्रसाधने तयार करताना खनिज पदार्थांचा उपयोग पॉवडर, क्रिम, फॉऊंडेशन, आय शॉडो तयार करण्यासाठी केला जातो.
मेकअपसाठी खनिज पदार्थांचा उपयोग करून तयार केलेल्या क्रिममुळे त्वचेचे अल्ट्रावायलेट किरणांपासून संरक्षण होते असते. या क्रिममध्ये असलेले खनिज पदार्थांचे कण अल्ट्रावायलेट किरणांना परावर्तित करत असतात. त्यात रासायनिक द्रव्य नसल्याने त्याच्या वापराने कोणत्याच प्रकारचा साईड इफेक्टस् होत नाही.
अशा सौंदर्य प्रसाधनांचा वापर केल्याने त्वचेवर असलेले रोम छिद्रही बंद होत नाहीत. त्वचा नेहमी सतेज असते. खनिज पदार्थांनी युक्त असलेल्या क्रिममध्ये व्हीटॅमिन्स व एन्टीऑक्सीडेंटचे भरपूर प्रमाण असते. आपल्या त्वचेवर तसेच चेहर्यावरील सुरकत्या व काळे डाग नाहीसे होण्यास मदत होते.
'मिनरल मेकअप'ची डिमांड
सध्या फॅशनच्या युगात मिनरल मेकअपची डिमांड वाढली आहे. लग्न, वाढदिवसाच्या पार्टीला जाण्यासाठी महिला खनिज पदार्थांनी युक्त सौंदर्य प्रसाधनास प्राधान्य देत आहे. ब्युटी पार्लरमध्ये 'मिनरल मेकअप' करण्यासाठी सध्या महिलांना 5000 पासून 7000 रूपये मोजवे लागत आहे.
