1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. फॅशन

फॅशनमध्ये रेड हॉट आणि गो ग्रीन!

फॅशनमध्ये रेड हॉट आणि गो ग्रीन
ND
रेड हॉट- मागील काही वर्षांमध्ये फॅशनम्हणजे, जे तुम्हाला पसंत आहे ते घाला आणि बिंदास राहा. तेच कारण आहे की आता चटक रंग फक्त मुलींमध्ये नव्हे तर मुलं ही सहजपणे ह्या रंगांचा वापर कपड्यांमध्ये करू लागले आहे. त्यात लाल रंग सर्वात पहिल्या नंबरवर आहे. नववधूचा तर हा आवडता रंग असतोच. आता तर शिफॉनची साडी, सलवार सूट किंवा इवनिंग गाऊन सर्व काही लाल रंगाचे असतात, तसेच मुलंसुद्धा आजकाल लाल रंगाचे शर्ट, कुर्ते, जोडे आणि ट्राउजरमध्ये दिसू लागले आहेत. तसं बघितले तर आम्ही कुठल्याही धार्मिक कार्यासाठी व समारंभात लाल रंगाला प्राधान्य देतो, कारण ह्या रंगात आकर्षणाची गजबची क्षमता असते. त्याच सोबत मॅचिंग एक्सेसरीजच्या रूपात बँग्स, ब्रेसलेट, ज्वेलरी इत्यादी आहेच.

ब्यूटिफुल ब्ल्यू - डोळ्यांना शीतलता देणारा हा रंग खासकरून पुरुषांची पहिली पसंत असते. शर्टस, कुर्ते, टीशर्टपासून शॉर्टस पर्यंत तुम्हाला ब्ल्यूचे ढेर सारे शेड्स बाजारात मिळतात. आजकाल रेडियम ब्ल्यू, सी ब्ल्यू, शॉकिंग ब्ल्यू, डेनिम, इजिप्शियन ब्ल्यू, टर्किश ब्ल्यू, सफायर ब्ल्यू असे बरेच शेड्सचे डिझायनर ड्रेसेस आणि एक्सेसरीज लोकांना पसंत पडत आहे.

ND
गो ग्रीन- हिरव्या रंगाचे बरेच शेड्स आहे आणि लोक त्यांना वापरू लागले आहेत. यात मुख्यकरून लीफ ग्रीन, रेडियम ग्रीन, आर्मी ग्रीन, एमरल्ड ग्रीन, सी ग्रीन आणि फ्लोरोसेंट ग्रीन पहिली पसंत आहे. ह्या रंगांचे परिधान मुलं-मुली दोन्ही मोठ्या आवडीने घालतात. डार्क ग्रीन जॅकेट आणि ट्राउजरसोबत लाइट ग्रीन शर्ट आणि डार्क ग्रीन टाय तुम्हाला एक वेगळेच लुक देईल. तसेच मुलींसाठी ग्रीनमध्ये भरपूर विकल्प आहे.

पर्पल आणि मॅजेंटा- हे दोन्ही रंग वयोवृद्ध बाया आणि पुरुष आवडीने घालतात. दोन्ही रंग सुंदर कॉम्बिनेशन आणि बऱ्याच प्रकारच्या मॅचिंगबरोबर घातले जातात. तसेच ट्रेडिशनल ते वेस्टर्न परिधानांमध्ये हे रंग पसंत केले जातात.

फॅस्टिव यलो- भारतीय सण आणि धार्मिक कार्यक्रमात पिवळ्या रंगाचे फारच महत्त्व आहे. यात गोल्डन यलो, लेमन तथा गडद पिवळ्या रंगांचे क्रेझ जास्त आहे. यांना सुद्धा तुम्ही वेस्टर्न आणि ट्रेडिशनल दोन्ही प्रकारात घालू शकता.

या प्रमुख रंगांशिवाय तुम्ही मल्टीकलर कॉम्बिनेशन आणि अन्य चटक रंगांचा प्रयोग करू शकता. खासकरून सण आणि पार्टीत चटक रंगांचा वापर केल्याने ऊर्जेचा प्रवाह वाढतो. तेच नव्हे तर आता परिधानांशिवाय एक्सेसरीज, पडदे आणि गाड्यांची खरेदीसाठी लोक चटक रंगांना पसंत करू लागले आहेत. मग आता तुम्ही वेळ न घालवता या रंगात रंगण्यासाठी तयार राहा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा