सौंदर्य वाढवा घरगुती उपायातून
सौंदर्यवृद्धीचे घरगुती व अत्यंत सोपे उपाय आपल्याला सुचविते. थोडे कष्ट आणि थोडा वेळ खर्च केला तर आपला फार फायदा होईल आणि कृत्रिम, रसायनिक सौंदर्य प्रसाधनांच्या दुष्परिणामांपासून आपली सुटका होईल.
तजेलदार त्वचेसाठी
आठवड्यातून दोन/तीन वेळा करता येण्यासारखा उपाय म्हणजे बेसन, हळद आणि दूध मिक्स करून, त्यात साधे मीठ टाकावे आणि कोणत्याही तेलाचे 5/7 थेंब टाकावे. मिश्रण एकजीव करून चेहर्याला व मानेला लावावे. पेस्ट वाळल्यानंतर 10-15 मिनिटांनी काढून टाकावी.
सावळेपणा दूर करण्यासाठी
त्वचेची श्यामलता किंवा सावळेपणा दूर करण्यासाठी एक बादली पाण्यात एक लिंबूचा रस टाकावा. या पाण्याने स्नान करण्याने त्वचेची बंद रंध्रे खुलतात आणि त्वचा उजळते. हिवाळ्यात हा प्रयोग करताना गरम पाणी घ्यावे आणि उन्हाळ्यात थंड पाणी घ्यावे. सावळेपणा दूर करण्यासाठी आवळा चूर्णात थोडं पाणी मिसळून ती पेस्ट चेहर्यावर व पूर्ण शरीरावर चोपडावी.
ओठांचे सौंदर्य राखण्यासाठी
ओठ काळे पडले असतील तर दुधात मीठ मिसळून लावावे. काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुवून टाकावे. ओठांवर पापडी जमा होत असेल तर लोण्यात केशर मिसळून ओठांना लावावे.