केसांची काळजी घेण्यासाठी खालील टिप्स आम्ही देत आहोत. त्याचे पालन केल्यास 'ये हवाएँ जुल्फो मे तेरी गुम हो जाए.... * असे कुणी तुमच्यासाठी म्हटल्याशिवाय रहाणार नाही. * आठ-दहा ग्लास पाणी केसांवर घाला. * शांपू किंवा कंडिशनर लावण्याआधी हातावर घ्या मग केसांना लावा. * केस धुतल्यानंतर एकदा परत पाण्याने स्वच्छ धुवा. * शांपू किंवा कंडिशनर लावल्यानंतर केस कमीत कमी दोन वेळा धुवा. * केस धुण्याआधी केसांना तेलाने मालीश करा. * तेलकट केसांना परत परत विंचरू नका. कारण त्याने केसांच्या मुळांशी असलेले तेल निघून जाते. आणि ते चिपचिपे वाटायला लागते. * रुक्ष केसांसाठी तेलात अंड्याचा बलक टाकून लावा. * आपली दिनचर्या आणि व्यक्तिमत्वानुसारच हेअरस्टाइल करा. * केशभूषा जास्त वेळ टिकून राहावी यासाठी हेअर स्टाइलिंग जेलचा वापर करा.
|