उंच, कोमल आणि नितळ मान म्हणजे सौंदर्याचा मापदंड समजला जातो. वय वाढत जाते, तसे त्याचा प्रभाव सगळ्यात आधी मानेवरच दिसायला लागतात. सौंदर्यांच्या दृष्टीने चेहर्याचे महत्त्व तर आहेच पण चेहर्याची काळजी घेताना मानेकडे दुर्लक्ष होत राहिले, तर चेहरा आणि मानेच्या त्वचेच्या रंगामध्ये फरक पडतो. मानेची काळजी घेण्यासाठी खाली दिलेल्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
* काकडीची पेस्ट बनवून घ्या. त्यात थोडं दही मिसळून मानेवर लावल्याने मानेवरचे डाग दूर होतात.
* मसुर डाळ रात्रभर भिजत ठेवून सकाळी वाटून घ्यावी. त्यात मध किंवा दही मिसळून मानेवर लावून 15-20 मिनिटापर्यंत तसेच ठेवावे. नंतर अंघोळ करावी. त्याने मानेचा काळेपणा दूर होऊन त्याला चमक येईल.
* आठवड्यातून किमान एकदा उटण्याचा वापर करून मानेची त्वचा स्वच्छ करून घ्यायला हवी.
* फेसपॅक हा केवळ चेहर्यासाठीच नव्हे तर तुमच्या मानेसाठीही आवश्यक असतो. जेव्हा चेहर्याला पॅक लावतो तेव्हा तो संपूर्ण मानेलाही लावायलाच हवा.
* मानेचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण साधन म्हणजे साय आणि लिंबाचा रस. सायीमध्ये लिंबाचा रस मिसळून मानेभोवती मसाज करायला हवा.
* मान स्वच्छ ठेवण्यासाठी शक्यतो साबणाचा वापर करू नये. यासाठी आठवड्यातून किमान दोनदा क्लिंझींग मिल्कच्या साहाय्याने मान आणि गळा स्वच्छ करावा.
नियमित अशी काळजी घेतल्यास मानेचे सौंदर्य निश्चितच टिकवून ठेवता येईल.
|