Widgets Magazine
 

सौदर्य खुलविण्यासाठी सोपे उपाय

beauty
ND
कारल्याची साल चेहर्‍यावर चोळा. यामुळे पिंपल, ब्लॅकहेड निघण्यासाठी मदत होईल. हा उपाय साधारण तीन ते पाच दिवस करून पाहा. फरक जाणवेल.

दूध, चिमूटभर हळद आणि दोन-तीन तुळशीची पानं यांची पेस्ट काळवंडलेल्या हाताच्या कोपरांवर लावा. ही पेस्ट रात्री लावून ठेवा आणि सकाळी हात धुवा. सात दिवस हा उपाय करा, फायदा होईल.

संत्र, लिंबू आणि काकडीची सालं मिक्सरमध्ये एकत्र वाटून घ्या. ही पेस्ट फेसपॅक म्हणून वापरता येईल. कमीतकमी २० मिनिटं हा पॅक चेहर्‍यावर लावा. हा पॅक रोज लावता येईल. सतत काही दिवस हा उपाय करा. त्वचा चमकदार होईल.

हातापायांवरील व्रण, डाग घालवण्यासाठी लिंबाची साल त्यावर पाच ते सात मिनिटांसाठी चोळा. हा उपाय दिवसातून दोनदा असा कमीतकमी सात दिवस तरी करा. डाग कमी होतील.

चंदनाची पावडर आणि कच्चं दूध एकास तीन या प्रमाणात एकत्र करून तोंड आणि हातावर चोळा. १५ मिनिटांनी धुऊन टाका. हा उपाय साधारण दर दोन दिवसांनी करा. त्वचा चमकदार होईल.

यावर अधिक वाचा :  
Widgets Magazine

सखी

पार्टीसाठी स्टायलिश ड्रेस

पार्टीमध्ये घालण्यासारखा हा सोबर कलरचा ड्रेस आहे. विशेषतः संध्याकाळच्या पार्टीसाठी सूट तो ...

बुरशीचा संसर्ग टाळण्यासाठी

पावसाळयात आंघोळीसाठी काही विशिष्ट वनौषधींचाही वापर करावा, पाण्यात कडूलिंबाची पाने आणि ...

नखं साफ करण्याचा सोपा उपाय

नखं साफ करण्यासाठी सोपा उपाय म्हणजे साधारण गरम पाण्यात हात पाच-सहा वेळा साबणाने स्वच्छ ...

केसात जर कोंडा असेल तर

केसात जर कोंडा असेल तर केसांना सफरचंदाचा रस लावावा, त्यामुळे कोंडा दूर होण्यास मदत होईल.

Widgets Magazine

Cricket Scorecard

Widgets Magazine

आज-काल

'ए मेरे वतन के लोगों...'

लतादीदींसमवेत १ लाख लोक गाणार?

इंग्लिश बोला, पैसे कमवा

भाषिक अस्मितेच्या नावाने राजकीय नेत्यांनी कितीही बोंबा मारल्या तरी कमाईच्या बाबतीत विश्वभाषा ...

नवीनतम

फार्मसी क्षेत्रात करिअर

फार्मसी म्हणजे फक्त औषधांचं दुकान नव्हे. संशोधन क्षेत्रातही फार्मसीचं खूप मोठं योगदान आहे. फक्त ...

Try This : पाकसल्ला

भाजा फ्रीजमध्ये ठेवताना एक कोरडा स्पंजाचा तुकडा त्याबरोबर ठेवा. दोन-तीन दिवसानंतर स्पंजाचा तुकडा ...

Widgets Magazine