मंगळवार, 25 नोव्हेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. करिअर मार्गदर्शन
Written By वेबदुनिया|

एमसीएत उज्वल भवितव्य

एमसीएत उज्वल भवितव्य
सध्याचे युग हे संगणक युग मानले जाते. म्हणूनच देशातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय आणि खाजगी शिक्षण संस्थांमध्ये संगणकाचे शिक्षण सक्तीचे करण्‍यात आले आहे. देशातील अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये एमसीएची डिग्री दिली जाते. याचा लॉंगफॉर्म मास्टर इन कॉम्पुटर एप्लीकेशन असा होतो.

माहिती आणि तंत्रज्ञानाचे जाळे वेगाने पसरते आहे. असे असताना अनेक विदेशी कंपन्यांची भारतीय विद्यार्थ्यांवर नजर आहे. यात याहू, मायक्रोसॉफ्ट, गूगल, आदींसह मोटारोला, आयबीएम, टीसीएस, इन्फोसिस अशा अनेक प्रतिष्ठीत कंपन्यांनाही एमसीए झालेल्या विद्याथ्यांची गरज असते.

नॅसकॉमने केलेल्या एका ताज्या सर्वेक्षणानुसार येत्या दोन वर्षात दोन लाखांहून अधिक एमसीए विद्यार्थांची गरज विविध कंपन्यांना आहे.

एमसीए केल्यानंतर तुम्ही बनू शकता:
1. सॉप्टवेअर इंजिनीअर
2. डाटाबेस एडमिनीस्ट्रेटर
3. वेब डिझायनींग तज्ज्ञ
4. सिस्टीम मॅनेजर
5. नेटवर्क एडमिनीस्ट्रेटर
6. सिस्टम एनालिस्ट
तसेच तुम्ही स्वत:चा व्यवसायही सुरु करू शकता.

एमसीएत केवळ डिग्री मिळवून फायदा नाही तर ही डिग्री चांगल्या इन्स्टिट्यूटची हवी. कारण अशा संस्थांमध्ये चांगल्या कंपन्यांचे कँपस इंटरव्ह्यू होतात, आणि त्यांना सॅलरी पॅकेजही चांगले मिळते.

यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो,
IIT Roorkee
NIT Trichy
NIT MNR
NIT Suratkal
NIT Warangal
NIT Calikat
NIT MACT Pune
आदी संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तुम्हाला प्रवेश परिक्षेत उत्तीर्ण होणे गरजेचे आहे.

योग्यता:
यासाठी 10+2 अर्थात बारावी उत्तीर्ण आणि गणित विषय हवा.