शनिवार, 4 ऑक्टोबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. करिअर मार्गदर्शन
Written By वेबदुनिया|

क्रीडा क्षेत्रात करीयर करा

खेळातही करिअरची संधी
आपल्याकडे खेळाला केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून पाहिले जाते. खेळ म्हणजे अभ्यासातून वेळ काढून मनावरचा ताण दुर करण्याचे साधन समजले जाते. पण तरीही क्रीडा क्षेत्र काही करीयर होऊ शकत नाही म्हणून अनेक पालक मुलांना लहानपणापासूनच खेळापासून दूर ठेवण्‍याचा प्रयत्न करतात. पण आता ही मानसिकता बदलायला हवी. क्रीडा क्षेत्रातही करीयरची उत्तम संधी आहे. किंबहूना याकडे आता करीयर म्हणून पहायला हवे. आज घडीला कॉर्पोरेट जगतानंतर सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारी नोकरी म्हणजे क्रीडा उद्योग ठरला आहे. यावरून काय ते ओळखा.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ही भारतातीलच काय तर जगातील सर्वात श्रीमंत खाजगी संस्था आहे. आणि भारतीय खेळाडूंना मानधनापोटी कोट्यवधी रुपये मिळत आहेत. खेळाडूही करोडपती होऊ लागले आहेत. सचिन तेंडूलकर, सानिया मिर्जा, लिएंडर पेस, महेश भूपति, हम्पी आणि हरिकृष्ण, अभिनव बिन्द्रा, जसपाल राणा, राजवर्धन राठोड, अंजली वेदपाठक व नारायण कार्तिकेयन हे वेगवेगळ्या खेळांतील खेळाडू त्यापैकीच आहेत. यात या खेळाडूंना कीर्ती तर मिळालीच पण प्रतिष्ठाही मिळाली.

सरकारचे प्रयत्
खेळाकडे पहाण्याचा सरकारी दृष्टीकोनही आता बदलला आहे. खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने क्रीडा धोरणच तयार केले आहे. स्पोर्टस् ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून तरुणांना खेळाकडे आकर्षीत करण्याचा प्रयत्न सरकारने सुरु केला आहे.

खेळाचे आकर्षण हवे
मारुन मुटकून कोणाला खेळाडू बनवता येत नाही. त्यासाठी स्वत:ला त्या खेळाचे आकर्षण असणे अत्यंत महत्वाचे आहे. प्रत्येकाच्या आकर्षणाचे केंद्र वेगवेगळे असतात. कोणाला कॅरम आवडतो, तर कोणाला क्रिकेट, तर कोणाला फुटबॉल. हे आकर्षणच खेळाडूंमध्ये नवीन जिद्द निर्माण करते.

धावांचा पाउस म्हणजे पैशांचा पाऊ
भारतात क्रिकेट हा धर्म बनला आहे. क्रिकेट चाहते खेळासाठी काहीही करु शकतात. यात ग्लॅमर आहे. पैसाही आहे. म्हणून इतर खेळांच्या मानाने क्रिकेटकडे आकर्षित होणार्‍यांची संख्या जास्त आहे. आणि यामुळेच प्रत्येक राज्यात याचे तंत्रशुद्ध शिक्षण देणार्‍या विविध संस्था कार्यरत आहेत. काही संस्थांना तर बीसीसीआयचा वरदहस्तही लाभलेला आहे.

बिलियर्ड
मायकल फरेरा आणि गीत सेठी यांनी बिलियर्डमध्ये विश्वविजेतेपद मिळवून या खेळाला आपले करिअर म्हणून निवडले.त्यांच्यापूर्वी भारतीयांना हा खेळ फारसा माहितही नव्हता. आधी हा खेळ केवळ विशिष्ट क्लब, अथवा शिबिरांमध्येच खेळला जात त्यामुळे याला श्रमंती थाट मानले जात असे. आता चित्र पूर्णत: बदलले आहे. आज संपूर्ण देशात स्नूकर हाऊस, आणि बिलियर्ड रुम्स निर्माण झाले आहेत. त्यामुळे खेळाडूंसाठी हा खेळ अत्यंत सुलभ झाला आहे.

घोडेस्वारी
भारतात घोडेस्वारी हा खेळ प्राचीन मानला जातो. राजे महाराजे त्यांच्या काळात मनोरंजन करण्यासाठी हा खेळ खेळत. यानंतर इंग्रजांनी या खेळाला खरी प्रसिद्धी मिळवून दिली. भारत सरकारनेही या खेळाचे पुनरुज्जीवन करत इक्वेस्ट्रीयन फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना केली.या खेळात करिअर करायचे असेल तर दिल्लीचा चिल्ड्रन्स रायडींग क्लब उत्तम पर्याय आहे.

नौकायन(याचिंग)
गेल्या काही दिवसांपासून नौकायन अर्थात याचिंगची प्रसिद्धी झपाट्याने वाढत आहे. अनेक महाविद्यालयांनी या खेळाचा समावेश आपल्या अभ्यासक्रमात केला आहे.

द याचिंग असोसिएशन ऑफ इंडिया भारतात या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन करण्‍यात आले आहे. या माध्यमातूनही आपण या खेळात करिअर करू शकता.

हॉक
भारताचा राष्ट्रीय केळ म्हणजे हॉकी. 1928 ते 56 या दरम्यान खेळल्या गेलेल्या 24 ऑलिंपीक सामन्यांपैकी भारताने सर्वच्या सर्व सामने जिंकले आहेत, यावरूनच भारतात हा खेळ किती लोकप्रिय आहे याचा अंदाज येतो. गेल्या काही दिवसांपासून या खेळाकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे, परंतु या खेळात करिअर करण्‍याची उत्तम संधी आहे.

फुटबॉल
भारतात अजूनही हा खेळ फारसा प्रसिद्ध नाही. पश्चिम बंगालमध्ये मात्र हा खेळ खेळला जातो. यासाठी विविध क्लबही आहेत. भारताबाहेर या खेळाला चांगला दर्जा आहे. या क्षेत्रातही करिअरची उत्तम संधी आहे. यासाठी विविध क्लब कार्यरत असून, त्यांच्या माध्यमातून याचे प्रशिक्षण उपलब्ध आहे.

बुद्धिबळ
हा खेळही भारतात अतिप्राचीन मानला जातो. शालेय स्तरावरून ते अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही या खेळाचे सारखेच महत्व आहे. भारतातील अत्यंत जुना खेळ असूनही याकडे दुर्लक्ष केले गेले. परंतु विश्वनाथ आनंदने या खेळात भारताचा झेंडा इतका भक्कमपणे रोवला आहे, की या खेळाला आता भारतात महत्वाचे स्थान आहे. या खेळाच्या प्रशिक्षणासाठी ऑल इंडिया चेस फेडरेशनने राष्ट्रीय केंद्राचीही स्थापना केली आहे. चतुरंगम डॉट कॉमवर याला ऑनलाईनही खेळता येऊ शकते.

टेनिस
सध्या सानिया मिर्झामुळे या खेळाला चांगलेच ग्लॅमर आले आहे. तिच्यापूर्वी रामनाथ कृष्णन, अमृतराज आणि नंतर महेश भूपती आणि लिएंडर पेस यांनी वेळोवेळी आंतरराष्ट्रीय सामने जिंकत या खेळाला भारतात लोकप्रीयता मिळवून दिली.

या खेळातही चांगले करिअर घडवता येऊ शकते. यासाठी कृष्णन टेनिस सेंटर, ब्रिटानिया अमृतराज टेनिस फाऊंडेशन, एस टेनिस अकादमी, सिंनेट टेनिस आदी संस्था कार्यरत आहेत.

या खेळांबरोबरच आता शुटींग, एथलेटिक्स, स्वीमिंग, कार रेस, बॉक्सींग आणि कुस्ती या खेळातही करिअर करण्याची उत्तम संधी आहे.