1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. करिअर मार्गदर्शन
Written By वेबदुनिया|

बिजनेस मॅनेजमेंट, पर्यांयांचा वटवृक्ष

मधुर नानेरिया

बिजनेस मॅनेजमेंट
NDND
आज आपण व्यवसाय जगताकडे नजर टाकली असता आपल्याला असे दिसून येते, की व्यवसायाचे आयाम बदलले आहेत. व्यवसाय आज नव्या पद्धतीने केला जातो. त्याला आता शैक्षणिक आधारही लाभला आहे.

बिजनेस मॅनेजमेंटला म्हणूनच मागणी आहे. हे शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या व्यवस्थापकाला अतिशय चतुरस्त्र काम करावे लागते. देशातील अनेक कंपन्या आता आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत. जा‍गतिकीकरणातही ते आपला झेंडा मिरवत आहेत. जागतिकीकरणातील स्पर्धेत कंपन्या अशा व्यवसायाच्या शोधात आहेत, जेथे कोणीही पोहचलेले नाही.

या कंपन्या आपला व्यापार वाढविण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या स्तरावर जाऊन व्यापार करतात. आपल्या व्यापाराला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी विविध योजना, युक्त्या अवलंबण्याचा प्रकार आज काल होताना दिसत आहे.

अशा कंपन्यांत वेगळा व गतीशील विचार करणाऱ्यांची चलती आहे. आपल्याजवळ असलेल्या कौशल्याच्या माध्यमातून ही मंडळी व्यवसायाला एका उंचीवर नेऊ पाहतात. इथेच एमबीए उपयोगी पडतात. बिझनेस स्कूलमध्ये प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या जोरावर व्यवसाय वाढविचा येणे शक्य आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे. म्हणूनच आज एमबीएजची मागणी वाढत आहे.

आपल्या देशात काही निराशावादी लोक आहेत. जे आपले ज्ञान गुंडाळून फिरतात. त्यांना असे वाटते की एमब‍ी‍एचा फुगा लवकरच फुटणार आहे. परंतु, जोपर्यंत व्यापार जगत अस्तित्वात आहे तोपर्यंत व्यवसायात कुशल असलेले लोक आपला व्यवसाय चालविण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे चांगल्या दर्जेदार बिजनेस स्कूलमध्ये मॅनेजमेंटची पदवी घेऊन बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांची मागणी वाढतच राहणार आहे.

नवीन करिअरसाठी अशा प्रकारच्या क्षेत्रात नेहमीच संधी उपलब्ध होणार आहे. मागील काही वर्षापासून आपण पाहत आहात की, या क्षेत्रात एकापेक्षा एक दर्जेदार करिअर क्षेत्र पुढे येत आहेत. त्यामध्ये डेअरी मॅनेजमेंट, हॉस्पिटल मॅनेजमेंट, एविएशन मॅनेजमेंट, वेस्ट मॅनेजमेंट, एग्री-बिजनेस मॅनेजमेंट यांचा समावेश आहे. त्याचबरोबर रोज एक नवीन व्यवस्थापन क्षेत्र येत आहे. याचा अर्थ असा की, आजची युवा पिढी स्वप्न पाहत नसून त्यांना आपले स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना दिस‍त आहे.

आता केवळ मार्केटींग, फायनान्स, मनुष्यबळ विकास विभाग, ऑपरेशन्स, आयटी, जाहीरात इत्यादी परंपरांगत क्षेत्राशी मर्यादी‍‍त राहणार नाही. अजूनही परंपरागत व्यवस्थापन अधिक लोकप्रिय आहे. कारण त्यांना संपूर्ण देशात व्यापक स्वरूपात स्विकारले जाते. आता महाविद्यालयात अशा प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची मागणी केली जाते, की, त्यामध्ये विद्यार्थ्याला आपल्या आवडीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल.