आगामी काळातील जग सायबर लॉच्या कक्षेतच चालेल. संपूर्ण जगात इंटरनेट पोहचले असल्यामुळे ते न्यायमंडळाच्या कक्षेत येते. इंटरनेट गुन्हेगारीबद्दलची सर्व प्रकरणे सायबर लॉच्या माध्यमातूनच सोडविली जातात.
इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आले असले तरी या हे माध्यम गुन्हेगारी जगतातही फळले आहे. इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणार्या फसवणुकीचा आणि कॉम्प्यूटर हॅकींगचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र बनत चालला आहे. त्यामुळे आपल्या न्यायप्रक्रियेलाही विचार करायला भाग पाडले आहे. या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रचलित कायदा सहाय्यक ठरला नाही. कॉम्प्यूटरच्या माध्यमातून गुन्हेगारी करणार्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कायद्याचा एक नवा अध्याय लिहिला गेला. आणि त्यालाच सायबर लॉ असे नाव देण्यात आले. ज्या प्रकारे देश-विदेशात सायबर गुन्हेगारी वाढत चालली असून त्यामुळे सायबर लॉचे महत्त्वदेखील वाढत आहे.
या क्षेत्रात करियर करण्यासाठी विद्यार्थ्यांना भरपूर संधी आहे. त्यासाठी आपल्याला कॉम्प्यूटरचे ज्ञान आणि आवड असणे आवश्यक आहे. अशा प्रकारे या क्षेत्रात अनेक युवकांना सायबर लॉयर (वकील) म्हणून नवी दिशा मिळू शकते.
अनेक वर्षापासून सुरू असलेल्या चोर्या, दरोडा आणि खून अशा प्रकारच्या गुन्हेगारी जगतात सायबर क्राइमने (गुन्हेगारी) एका नवीन रूपात प्रवेश केला आहे. इंटरनेट साइट हँकिंग, सायबर व्हायरसद्वारे संगणक प्रणालीत छेडछाड, क्रेडीट कार्डद्वारे हेराफेरी या प्रकरणांनी सध्या गोंधळ घातला आहे.
ND
अशा प्रकारच्या गुन्हेगारीत सर्वांत महत्त्वाची अडचण म्हणजे, आपल्या कॉम्प्यूटरवर आपल्याच सहकार्याने असे प्रकार होतात. तुम्हाला हे कळत देखील नाही की, एक माऊस क्लिक करून आपण काय गमावले आहे? क्रेडीट कार्ड तुमच्या खिशात असते परंतु, त्याचा वापर करणारा दुसराच कोणीतरी असतो. अशा प्रकारच्या गुन्हेगारीत कुणाकडे तक्रार केली तरीही त्याची विशेष अशी दखल घेतली जात नाही.
सध्या अस्तित्वात असलेल्या आपल्या भारतीय कायद्यात सायबर गुन्हेगारीबद्दल कोणत्याही प्रकारचा कायदा नव्हता. पण आयटी वर्ल्ड आणि सायबर स्पेसमध्ये गुन्हेगारी वाढत गेल्यामुळे आंतरराष्ट्रीय सहकार्याने सायबर लॉ तयार करून पोलिस आणि न्यायमंडळाची डोकेदुखी कमी करण्याचा प्रयत्न केला गेला.
आगामी काळातील जग सायबर लॉच्या कक्षेतच चालेल. संपूर्ण जगात इंटरनेट पोहचले असल्यामुळे ते न्यायमंडळाच्या कक्षेत येते. इंटरनेट गुन्हेगारीबद्दलची सर्व प्रकरणे सायबर लॉच्या माध्यमातूनच सोडविली जातात.
सायबर लॉयर कोण असतात?
ND
कॉम्प्यूटर हँकिंग, क्रेडिट कार्ड, कार्डची फसवणूक, ई-कॉमर्स आणि इंटरनेटवर ई-बिझनेसच्या संरक्षणासाठी डिजिटल स्वाक्षरीचे संरक्षण, इनक्रिप्शन कोड किंवा इलेक्ट्रॉनिक कोड इत्यादींशी जोडलेल्या गुन्हेगारीच्या खटल्यांचे निराकरण सायबर लॉयर करतात. बौद्धीक संपदा कायदा किंवा कॉपीराइट, सॉफ्टवेअर पेटंट, नेट बॅकींग यासारखे प्रकरणे सायबर लॉच्या मदतीने सोडविले जातात.सायबर लॉयर बनण्यासाठी आपल्याला कायदा (विधी) अभ्यासक्रमात पदवी प्राप्त केल्यानंतर सायबर लॉ मध्ये पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल. कायद्याच्या पदवीशिवाय अन्य विषयांतील पदवीधारकही सायबर लॉचा कोर्स करू शकतात. हा अभ्यासक्रम आयटी आणि ई-कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी अधिक उपयोगी ठरू शकतो.
आता भारतातही अनेक लॉ स्कूल आणि विद्यापीठात पदव्यूत्तर अभ्यासक्रम शिकविला जात आहे. नॅशनल अकादमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च यूनिवर्सिटी ऑफ हैद्राबाद आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई येथेही सायबर लॉ विषयात पदव्यूत्तर पदविका अभ्यासक्रम शिकविला जातो.
सायबर लॉचा व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविल्या जाणार्या महत्त्वाच्या शिक्षण संस्था 1. नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया, बंगलोर विद्यापीठ, वेबसाइट: www.nis.ac.in 2. गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, मुंबई 3. नॅशनल अकादमी ऑफ लीगल स्टडीज एंड रिसर्च यूनिवर्सिटी ऑफ लॉ हैदराबाद-27 वेबसाइट ww.nalsaroro.org 4. द इंडियन इंन्स्टीट्यूट ऑफ इन्फरमेशन अँड टेक्नॉलॉजी, इलाहाबाद वेबसाइट www.iiita.ac.in 5. सिम्बॉयसिस सोसायटी लॉ कॉलेज, पुणे 6. एशियन स्कूल ऑफ साइबर लॉज, पुणे वेबसाइट www.asianlaws.org 7. द इंडियन लॉ इंन्स्टीट्यूट (स्वायत्त विद्यापीठ) नवी दिल्ली 8. साइबर लॉ कॉलेज (एनएएवीआय), चेन्नई, म्हैसूर, हुबली, मंगलोर आणि बंगलोर वेबसाइट www.cuberlawcollege.com