बायोमेडिकल इंजिनियरींगमध्ये करियर
जागतिक आरोग्य संघटनेने कधी कल्पना देखील केली नसेल की एक दिवस इंजिनियरींग व मेडिकल ही दोन्ही स्वतंत्र क्षेत्रे एकत्र येतील व विज्ञानाला नवसंजीवनी देतील. मेडिकल व इंजिनियरींग या दोन्ही शाखा फार जुन्या असून नव्या पिढीतील उमेदवारांना आव्हान देणाऱ्या आहेत. गेल्या काही वर्षांत या दोन्ही क्षेत्रांचा विकास झपाट्याने झाला असून बायोमेडिकल इंजिनियरींग हे नवीन क्षेत्र उदयास आले आहे. बायोमेडिकल इंजिनियरींग क्षेत्राचा विकास झपाट्याने होत असून त्याचे स्वरूप व्यापक झाले आहे. त्यात रिसर्चपासून करियर बनवण्याच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यात डॉक्टर व सायंटिस्टसारखे 'बायोमेडिकल इंजिनिअर' मानव व प्राणी यांच्यासोबत कार्य करत असतात. तसे जर पाहिले तर बायोमेडिकल इंजिनियर इतर लाईफ सायंटिस्ट, केमिस्ट व मेडिकल सायंटिस्ट यांच्यासोबत उपचारात्मक औषधी तयार करण्यात मदत करतात. मात्र, त्यांचे कार्य इतर मेडिकल प्रोफेशनल्सपेक्षा वेगळे असते. कारण ते स्वत: उपचार करत नाहीत. निदान व उपचाराचे साधन ते तयार करतात. मेडिकल रिसर्चला सोपे करण्यासाठी ते उपकरणे तसेच कार्य प्रणाली व प्रक्रिया विकसित करत असतात. तसेच आरोग्य व चिकित्सेच्या समस्या सोडवण्यासाठी ते सहकार्य देखील करत असतात. बायोमेडिकल इंजिनियरींग या क्षेत्राचा सातत्याने विकास होत असल्याने संशोधनासाठी लागणाऱ्या सुविधा विकसित करण्यात येत आहेत. त्यामुळे मेडिकल क्षेत्रात उपचार पद्धतीला एक नवीन दिशा मिळाली आहे. |
जागतिक आरोग्य संघटनेने कधी कल्पना देखील केली नसेल की एक दिवस इंजिनियरींग व मेडिकल ही दोन्ही स्वतंत्र क्षेत्रे एकत्र येतील व विज्ञानाला नवसंजीवनी देतील |
|
|
चिकित्सा पद्धतीत टिशू मॅनिप्युलेशन, कृत्रिम अवयव, जीवनरक्षक उपकरणे, पेसमेकर व डायलीसिस, सर्जिकल उपकरणे, मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी त्यात एमआरआय, सिटी स्कॅनिंग व सोनोग्राफी हे शब्द आपल्याला ऐकायला मिळतात किंवा आपण ज्या उपचार पद्धतींचा वापर करतो ती बायोमेडिकल इंजिनीअरिंगचीच देणगी आहे.बायोमेडिकल इंजिनिअर्स प्रॅक्टिशनर्स म्हणून आज मोठ्या संख्येने युवकांनी करियर निवडले आहे. या क्षेत्रात उमेदवारांची मागणी वाढत असल्याने चांगले करियर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. बायोमेडिकल इंजिनीअरींगला मेडिकल पेक्षा इंजिनियरींगचेच क्षेत्र समजले जाऊ लागले आहे. बायोमेडिकल इंजिनियरींगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला इंजिनियरींगची पदवी प्रदान केली जाते. सुरवातीला इलेक्ट्रिकल, केमिकल किंवा मॅकेनिकल इंजिनियरींग करणारे बायोमेडिकलइंजिनियरींगमध्ये स्पेशलायजेशन करत होते. मात्र आता तर 'बायोमेडिकल इंजिनियरींग' ही स्वतंत्र अभ्यास शाखा झाली आहे. बहुतांश विद्यार्थी बी. ई. करण्यासाठी 'बायोमेडिकल इंजिनियरींग' या शाखेची निवड करतात. तसेच एम. बी. बी. एस. केल्यानंतर देखील बायोमेडिकल इंजिनियरींग करता येऊ शकते.
भारतात बायोमेडिकल इंजिनियरींगमध्ये पदव्यूत्तर पदवीसोबत आयआयटी, मुंबई येथे डॉक्टरेट श्रेणीचे कोर्स देखील उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे बनारस हिंदू विश्वविद्यालय, वाराणसी व बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एण्ड सायन्स, विद्या विहार, पिलानी, राजस्थान येथे बायोमेडिकल इंजिनीअरिंगमध्ये एम. टेक ही पदवी उपलब्ध आहे. |
जागतिक आरोग्य संघटनेने कधी कल्पना देखील केली नसेल की एक दिवस इंजिनियरींग व मेडिकल ही दोन्ही स्वतंत्र क्षेत्रे एकत्र येतील व विज्ञानाला नवसंजीवनी देतील |
|
|
दिवसेंदिवस बायोमेडिकल इंजिनियरींगमध्ये विकास होत असल्याने उत्तम करियर म्हणून त्याची लोकप्रियता वाढत आहे. विदेशात बायोमेडिकल इंजिनिअर्सला मोठी मागणी आहे. आगामी 3-4 वर्षात या क्षेत्रात करियर करणाऱ्यांना चांगले दिवस येणार आहेत. बायोइंस्ट्रूमेंटेशन, बायोमटेरियल्स, बायोमॅकेनिक्स, सेल्यूलर, टिशू एण्ड जेनेटिक इंजिनियरिंग, क्लिनिकल इंजिनियरिंग, रिहेबिलिटेशन इंजिनियरिंग, ऑर्थोपीडिक सर्जरी, मेडिकल इमेजिंग व सिस्टम फिजियोलॉजी या बायोमेडिकल इंजिनीअरिंगशी संबंधित शाखा आहेत. भारतात बायोमेडिकल हेल्थ केयर रिसर्चला नावारूपाला आणण्यासाठी प्रा. गुहा, डॉ. हरिदासन, विंग कमांडर मोहन व डॉ. एच. वी. जी राव यांनी बायोमेडिकल इंजिनीअरिंग सोसाईटी ऑफ इंडियाची स्थापना केली आहे. संपूर्ण देशात 50 हून अधिक रिसर्च सेंटर स्थापन करण्याचे महत्त्वपूर्ण योगदान केले आहे. या केंद्रांवर व्यापक प्रमाणात डायग्नोस्टिक, बायोएनालीटिकल व थॅरेपेटिक उपकरणांचा उपयोग केला जात आहे. सोसाईटीच्या वतीने बायोमेडिकल इंजिनीअरिंगशी संबंधीत विषयांवर वेळोवेळी सेमिनार व कॉंफ्रेंरन्सचे आयोजन केले जाते. बायोमेडिकल इंजिनीअरिंगमध्ये अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवाराला करियर करण्यासाठी जगाच्या पाठीवर कुठेही काम करण्याची संधी सुवर्ण पावलांनी स्वत:हून चालत येते. संशोधन संस्था, रिसर्च सेंटर, फार्मासिटिकल कंपनी, सरकारी संस्थामध्ये बायोमेडिकल इंजिनिअर्सला मोठी मागणी असते. या व्यतिरिक्त मार्गदर्शक व सल्लागार म्हणून स्वतंत्र करियर करता येते.