1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. करिअर मार्गदर्शन
Written By वेबदुनिया|

भाषेतील करियर

भाषेतील करियर
NDND
करियर कुठल्या क्षेत्रात घडवावे, असा प्रश्न प्रत्येक सुशिक्षित तरूण- तरूणींना भेडसावत असतो. करियर निवडताना मातृभाषेव्यतिरिक्त इतर भाषांचे ज्ञान घेणे आवश्यक असते. एखादी नवीन भाषा शिकून आपल्याला त्या भाषेतही करियर करता येऊ शकते.

ग्लोबलायझेशनच्या या युगात दिवसेदिवस सातासमुद्रापलीकडच्या देशांशी समन्वय साधला जात आहे. त्यामुळे विदेशी भाषेचे ज्ञान आत्मसात करणे ही आज काळाची गरज होऊन बसली आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये जर्मन, रशियन, चायनीज, जापनीज, स्पॅनिश व कोरियन या विदेशी भाषाचा जास्त बोलबाला झाला आहे. या भाषा अवगत करून विविध क्षेत्रात आपल्या करियरला दिशा मिळण्याचे मार्ग खुले झाले आहेत. या क्षेत्रात खालील संधी मिळू शकतात.

* ऑपरेटर
* कंटेंट रायटर्स
* टेक्निकल ट्रान्सलेटर
* इंटरप्रेटर
* शिक्ष

एखाद्या विदेशी भाषेच्या ज्ञानासोबत तुमच्याकडे एखादी प्रोफेशनल डिग्री असल्यास तुम्हाला टूरिझम, एंटरटेनमेंट इंडस्ट्री, पब्लिशिंग हाऊस आदी क्षेत्रातही करियर करता येते. तसेच सरकारी कार्यालयात काम करण्याची संधी उपलब्ध होते.

विदेशी भाषा शिकण्यासाठी तीन प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत. सर्टीफिकेट कोर्स, डिप्लोमा कोर्स व डिग्री कोर्स. बहुतेक संस्थांमध्ये बेसिक व अ‍ॅडव्हान्स लेवलचे कोर्स उपलब्ध असतात. तसेच त्यात पदव्यूत्तर पदवीही मिळवता येते.
NDND


पात्रता - एखाद्या भाषात सर्टिफिकेट कोर्स किंवा पदवी कोर्सला प्रवेश घेण्यासाठी 12 वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. तसेच कुठल्याही महाविद्यालयात संब‍ंधित भाषेत पदवी कोर्सला प्रवेश करण्यासाठी त्याच भाषेत सर्टफिकेट कोर्स करणे आवश्यक आहे.

वेतन : या क्षेत्रात काम करणार्‍या उमेदवारास त्याच्या कामानुसार वेतन मिळते. 'शिक्षण' क्षेत्रात कार्य करणार्‍याना रूपये 10 हजारापासून तर 20 रुपयांपर्यत प्रती महिना वेतन मिळू शकते. तर 'ट्रान्सलेटर' म्हणून एखाद्या कार्यालयात काम करत असाल तर 50 रुपयापासून 500 रुपयांपर्यंत प्रती पान मानधन मिळवता येऊ शकते. 'इंटरप्रिटर' या पदासाठी तासांप्रमाणे मानधन मिळत असते. सरकारी कार्यालयात 'इंटरप्रिटर' पदाच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत असतात. रूपये आठ हजार ते 10 हजार रूपयांपर्यत प्रती महिना वेतन मिळवता येते.

वरील विषयांचे कोर्स, पदवी खालील महाविद्यालयामध्ये उपलब्ध आहेत-
अलीगड मुस्लिम विद्यापीठ, अलीगड
बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी
कॅलिकट विद्यापीठ, मालापूरम्
दिल्ली विद्यापीठ, दिल्ली
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली
या व्यतिरिक्त मुंबई, लखनौऊ, चेन्नई, पुणे, भुवनेश्वर आदी मोठ्या शहरातील विद्यापीठांमध्ये संबंधीत विषयाचे कोर्सेस उपलब्ध आहेत.