नृत्यात करीयरसाठी पूर्वअट
- अनुया जोशी
अलीकडे विविध प्रदर्शनातून समारंभातून लोकनृत्यांत कार्यक्रम केले जातात. तसेच विविध शालेय स्तरीय, महाविद्यालयीन स्पर्धेतूनही ही नृत्ये प्रस्तुत होतात. परंतु, हे प्रदर्शन अथवा स्पर्धेपुरती ही नृत्ये मर्यादित न ठेवता व्यासायिक पातळीवरही करण्याचा ध्यास बाळगावा. केवळ मनोरंजन अथवा छंद म्हणून कला जोपासणार्यांनी त्याचा व्यावसायिक स्वरूपात अभ्यास करावा. नृत्य प्रकारात करियर करताना सर्वप्रथम नृत्य सादरीकरण, नृत्याचे शिक्षण, नृत्य लेखन या क्षेत्रात करावे. आज आपण अशा विविध क्षेत्रातून यशस्वीपणे वाटचाल करणारे नर्तक पाहतो. सादरीकरण नृत्य हे अविश्रांत परिश्रमाचे असल्यामुळे प्रत्येक कलाकाराने आपली तब्येत ही जपलीच पाहिजे. त्याचे हात, पाय, पाठ कंबर हे बळकट असलेच पाहिजे. नृत्याच्या रियाजाच्या प्रदीर्घ कालावधीसाठी तेवढा स्टॅमिनाही त्यात असणे गरजेचे आहे. तालाची जाण व मोहक हालचालींमुळे नृत्य परिणामकारक ठरते. वय वर्ष 7 ते 50 हे नृत्य सादरासाठी विशिष्ट कालावधी समजला जातो. नर्तकाच्या जीवनात सण, सुट्या, सप्ताह अखेर किंवा विशिष्ट घडामोडीचा प्रसंग हा एक महत्त्वाचा भाग असतो. असे विशिष्ट दिवसांचे वेळापत्रक ठरवून तो रंगमंचीय कला सादर करतो. या क्षेत्रातील त्यांच्या प्रतिष्ठा आणि कीर्ती प्रमाणे हे नर्तक वर्षातील अनेक दिवस देशात, परदेशात प्रवास करत असतात. तसेच रंगमंचीय कार्यक्रमाखेरीज चित्रपट, दूरदर्शन वाहिनीवरील विविध नृत्यमालिका, सांगतिक व्हिडिओ आणि व्यापारी तत्त्वावरील स्पर्धा कार्यक्रमात भाग घेत असतात. लेखन नृत्याचा विविध अंगाने अभ्यास करू इच्छिवणार्यांना नृत्य लेखन हे ही एक मोठे दालन आज उघडे आहे. नृत्य लेखन ही एक कलाच आहे. नृत्याचे आलेखन करणेही संकल्पना म्हणून नृत्य लेखनाची व्याख्या देता येईल. पाश्चात्य लोक व सामाजिक स्वरूपाच्या नृत्याला पूर्वापार इतिहास असला तरी पाश्चात्याच्या तुलनेत पौर्वात्य नृत्यकलेलाही या पूर्वीचा इतिहास आहे. युरोपियन नृत्य प्रकाराच्या एक हजार वर्षापूर्वी भरतमुनिंनी नाट्यशास्त्र हे पहिले भारतीय नृत्यावरील पुस्तक लिहिले. ब्रह्मदेवाने ऋग्वेदातून पाठ्य, यजुर्वेदातून अभिनय, सामवेदातून गाणे व अथर्व वेदातून रस घेऊन पाचवा वेद बनविला त्यालाच नाट्यवेद संबोधले गेले, भरत मुनींच्या नाट्यशास्त्रात याचा उल्लेख आहे. नर्तकाला आपला कार्यक्रम व्यवस्थित सादरीकरणासाठी नृत्यलेखन करणाऱ्या व्यक्तीला गायक व वाद्यवृंद मंडळीशी समन्वय साधावा लागतो. नृत्य-लेखन करणाऱ्या व्यक्तीला कल्पनाशक्तीच्या जोडीला नृत्याच्या परिभाषेत संगीताची भाषा परावर्तित करण्याचे सामर्थ्थ हवे. नृत्यातील अत्यंत प्रगत अशा शिक्षणक्रमाचा नृत्य लेखन हा एक अविभाज्य घटक आहे. ताल, लय, गतीचा वेग कसा साधावा हे प्रत्याक्षाकाद्वारे दाखविता आल्यास त्याचा नृत्यलेखनातील भावना ते पोहचवू शकतो. परंतु, प्रत्येक कलाकाराची त्याच्या कलेतील शारीरिक गुंतवणूक ही वेगळी असते. त्यामुळे या बाबतीत त्याची संकल्पना ही स्वत:ची असते. ती शिकविता येत नाही. तो त्याच्या केलेने व बुद्धीने स्वबळावर लेखन विस्तृत करू शकतो. गुणवैशिष्ट्ये नर्तकामध्ये काही विशिष्ट गुण असावे लागतात. रंगमंचीय ज्ञान, वेषभूषेचे ज्ञान, सादरीकरणाची वैशिष्ट्यपूर्ण शैली, चेहर्यावरील हावभाव, शारीरिक ठेवण आणि ह्या पलीकडील सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तो सर्वांचा आदर राखणारा मणस्य तत्त्वाची जाणीव असणारा हवा. त्याचे दर्शन आकर्षक हवे. त्याच्या हालचालीत शक्यतो रुबाब हवा. अंर्तज्ञान, भाषा शैली स्वभावातील भावनिक खोली, चातुर्यता, लवचिकता संगीत व नाटकाचे रसग्रहण करण्याची पात्रता अष्टपैलुत्व समर्पणाची भावना सर्वस्तरीय मानसिक तयार, स्वच्छ व्यक्तिमत्त्व इत्यादी गुणांचा त्याने समन्वय साधला पाहिजे.शिक्षक म्हणून जर या क्षेत्राकडे वळायचे झाल्यास सहनशीलता हवी. दुसर्याला विशद करण्याची पात्रता, नृत्याची संपूर्ण जाण व सर्वस्तरीय सखोल अभ्यास हा असला पाहिजे तसेच बालगट ते वयोवृद्ध सर्वस्तरीय मंडळीमध्ये त्याला रमता आले पाहिजे. परिक्षार्थितील कौशल्य ओळखता आले पाहिजे तसेच नवशिकणाऱ्यालाही प्रशिक्षण देऊन शिकविता आले पाहिजे. अनुभवही असायलाच हवा. त्याला सांगतिक प्रशिक्षण मिळालेले असायला हवे. (
क्रमशः) नृत्य करीयरः एक संधी