नृत्य प्रशिक्षण व संधी
- अनुया जोशी
विद्यार्थी शाळेत शिकायला जाऊ लागला की त्याला नृत्य व्यवसायाचे विशिष्ट प्रशिक्षण देता येते यासाठी वय वर्षे सात हा महत्त्वाचा टप्पा आहे. हे प्रशिक्षण देणाऱ्याने मात्र सुरवातीलाच एक उत्तम व उच्चशिक्षित नर्तक असले पाहिजे या वेळी नृत्यातील कुठला प्रकार प्रशिक्षार्थिस योग्य आहे. हे ठरविले गेले पाहिजे.नियमितपणे नृत्याचे कार्यक्रम करणाऱ्या अनेक नर्तकांनी त्यांची नृत्यशाळा काढली आहे. त्याद्वारे ते प्रशिक्षणही देतात. शिक्षक म्हणून करियर करण्याचा विचार करणाऱ्यांना शिक्षण देण्यासाठी स्वत:च्या संस्थेची स्थापना करता येते. स्वत:च्या शैलीतील नृत्य त्याचा प्रचार प्रसार तो संस्थे मार्फत करू शकतो. हे नर्तक काही विद्यार्थ्यांना आपल्या सभात समावेश करून आपली नृत्य परंपरा पुढे चालविण्याचा यथोचित पायंडा पाडतात. शाळा कॉलेजच्या व्यवस्थेत तसेच खाजगी क्लासेस विविध ग्रुप मध्ये नृत्यशिक्षक आढळतात. भारतीय अभिजात सांगितात गुरुशिष्य परंपरेला महत्त्व प्राप्त झाले आहे. गुरुकुल पद्धतींमध्ये ही प्रशिक्षणाची मोठी संधी प्राप्त होऊ शकते. व्यावसायिक दृष्टीने नृत्यातील आवश्यक आणि महत्त्वाचे मूलभूत शिक्षण दहाव्या इयत्ते पर्यंतच्या विद्यार्थ्याला आपसूक भिकू लागते. दहाव्या इयत्तेची परीक्षा झाल्यावरच हा भावी नर्तक नियमितपणे नृत्याचे प्रशिक्षण घेण्यास पात्र ठरतो. असे काही नियम आहेत. इ. दहावी झाल्याशिवाय काही मान्यताप्राप्त संस्था या विद्यार्थ्यांना पुढील परीक्षा साठी पात्र ठरवत नाही. तेव्हा नृत्याचा सर्व अंगाने अभ्यास करू इच्छवीणाऱ्या व व्यवसाय म्हणून ह्या क्षेत्राकडे पाहणाऱ्या व्यक्तीला पद्धतशीर शिक्षण घेऊन नृत्यातील विविष्ट श्रेणीतील विद्या संपादन करण्यासाठी देभरात विविध मान्यताप्राप्त विश्वविद्यालयात प्रवेश घेता येतो. परंतु या साठी कलेचा प्रामाणिकपणे मनापासून अभ्यास करणे गरजेचे आहे. आज आपण पाहतो अमाप प्रसिद्धी व विविध माध्यमातून कलाकार हा आर्कषिला जात आहे. जागतिक स्तरावर नृत्यकलाकारास अनेक दारं उघडी आहेत त्याचा उपयोग मात्र योग्य व्हायला हवा. यश तुमच्या हाती आहे. संधीअभिजात व लोक नृत्याच्या साड्याच लोकप्रियतेत संस्था व अन्य प्रशिक्षणाद्वारे कार्य करणाऱ्यांसाठी मोठमोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. विविध नृत्य संस्था अकादमी शाळांना शासनाकडून आर्थिक मदत ही मिळते तसेच विद्वान प्रचंड अनुभवी, प्रदीर्घ सहवास नर्तकांना विविध योजनांद्वारे सन्मापूर्वक मानद सदस्यत्व मिळत आहे. त्यांना पुरस्कार ही दिले जातात. त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. व्यावसायिक तत्त्वावरील अन्य कार्यक्रमातून नृत्याचा व्यापक प्रमाणावर उपयोग करून घेतला जात आहे. तसेच शाळा कॉलेजमधून नृत्य हा विषय अभ्यासक्रमातही समाविष्ट केला आहे. नृत्य प्रकाराकडे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून आणि रंगमंचावर सादर करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांकडे प्रगतिशील धोरण अंगिकारून, प्रेक्षकांचा बदलता दृष्टिकोन जाणून जर कौशल्याचा वापर झाला तर तो नर्तकाला खूप आदर मिळवून मोठ्या प्रमाणावर मोबदला ही मिळवून देतो. सादरीकरण करणारा नर्तक म्हणून जर ओळख ठेवायची असेल तर नर्तकास प्रेक्षकांसमोर दिमाखात राहायला हवे. नवनवीन क्षेत्रापैकी फिजीकल फिटनेस क्षेत्राकडेही नर्तक वळत आहे. फिटनेस कडे वाढणारा कौल पाहता ओरोबीक्स सारख्या प्रकारातही संधीच्या मोठ्या वाटा उपलब्ध आहेत. त्याच प्रमाणे योगा प्राणायाम याचे महत्वही स्वत:च्या शैलीतून नर्तक उत्तम प्रकारे विशद करू शकतो. यासाठी बाजारात विविध प्रकारच्या सीडी, कॅसेट्स उपलब्ध आहेत, तसेच व्हीसीडी, सीडी कॅसेटांस द्वारे कलेचा प्रचार प्रसार होत आहे. यासाठी मोठ्यामोठ्या कंपन्यांकडून आर्थिक मदत केली जाते.मनोरंजक आणि अभिनव नवप्रर्तक नृत्यशैलादी हा हेतू सहज साध्य करता येईल. तेव्हा उत्तम शिक्षक, विद्यार्थी, लेखक कवी, गायक, वादक, सादरकर्ता मार्गदर्शक अश्या विविध स्तरीय संधीचा फायदा घ्या. बदलत्या काळा बरोबर व्यावसायिकरण वाढल्यामुळे नोकरी उद्योगात अधिकाधिक विषेशी कारणाची गरज भासू लागली आहे. एकविसाव्या शतकात छंद व कला जोपासून यश प्राप्त करणाऱ्यांचा नवा व्यावसायिक वर्ग उदयाला येत आहे. कुठलाही उद्योग सुरू करण्यासाठी त्याला विविध प्रकारे साह्य लागते परंतु नृत्यामध्ये स्वबळावर कुठल्याही प्रकारची खर्चिक गुंतवणूक न करता स्वत:च्या घरातून सुद्धा छोट्याशा जागेतून नृत्य प्रशिक्षण देता येते. चाकोरी बाहेरील व्यवसायाची खरी नांदी आत्ता कुठे सुरू झाली आहे, तेव्हा यातील संधी व जनसमुदायाचा वाढता कल ओळखून युवकांनी 'करियर' म्हणून याचा आधी विचार करावा व आपण यात सिद्ध करू शकतो हे दाखवून योग्य त्या गुरुच्या सानिध्यात राहून पालकांनाही यात सहभागी करावे.