मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By वेबदुनिया|

वास्तुशास्त्रात करियर बनवा!

वास्तुशास्त्र हे वास्तु निर्मितीची तत्वे आणि नियम यावर आधारीत आहे. वास्तुशास्त्रात सर्व नियम आणि तत्वाचे निर्धारण दिशा आणि पंचतत्त्वे (पृथ्वी, जल, अग्नी, आकाश आणि वायू) यांच्या आधारावर असते. या पंचतत्वांचे संतुलन साधून सर्व प्रकारच्या दोषांतून मुक्त होऊन सुख आणि समृद्धी मिळवता येते.

घर बांधण्याअगोदर जागेची निवड, बांधकाम कुठल्या दिशेने करायला हवे याचे निर्धारण करणे हे वास्तुशास्त्रीचे काम आहे. जागा लाभदायक आहे की नाही? माती कुठल्या प्रकाराची आहे? पाण्याचे स्रोत कुठे आहेत? भूखंडाच्या पुढे-मागे, आजू-बाजूच्या मार्गांचे काय महत्त्व आहे? भूखंडाच्या कुठल्या भागात बेडरूम, स्वयंपाकघर, बाथरुम, देवघर हवे हे वास्तुशास्त्री सांगू शकतो.

लोक आता वास्तुशास्त्रानुसार घराचे बांधकाम करू लागले आहेत. म्हणून वास्तुशास्त्रींचे महत्त्व देखील वाढले आहे. वास्तुशास्त्री बनण्यासाठी कुठल्याही महागडा कोर्स किंवा अन्य विशेष डिग्रीची गरज नसते. तुम्ही वास्तुशास्त्रात करियर बनविण्यास इच्छित असाल तर पत्राद्वारे 6 महिन्याचा डिप्लोमा कोर्स करता येतो. यासाठी महागड्या पुस्तकांची किंवा वर्गात बसण्याची गरज नसते. एकदा तुम्हाला या शास्त्राचे चांगले ज्ञान झाले की मग तुम्ही घरी बसल्या लोकांना मार्गदर्शन करू शकता व चांगले पैसे कमावू शकता. एखादी गृहिणी घर सांभाळूनसुद्धा हे काम करू शकते. देश-विदेशातील बर्‍याचशा संस्था पत्राद्वारे हा अभ्यासक्रम चालवतात. या विषयाची आवड असेल तर तुम्हीसुद्धा करियर म्हणून हा विषय निवडू शकता.

पत्राद्वारे वास्तुशास्त्र अभ्यासक्रम :
ग्लोबल एकेडमी ऑफ वास्तू एंड डिझाइन
(एआरईडी दिल्ली मान्यता प्राप्त)
10 ए / 14, शक्ती नगर, दिल्ली- 110007
फोन - 011-23848314, 9250307872
ई- मेल- vastucourse@ hotmail.com