वा! शाबास बिरबल!
|
''बिरबल, पाण्याची मदत न घेता रेती आणि साखर यांच्या मिश्रणातून साखर कशी वेगळी काढता येईल?''
यावर बिरबल म्हणाला, ''असे, मिश्रण जमिनीवर पसरून ठेवायचे. काही वेळाने तेथे मुंग्या येतील आणि फक्त साखर घेऊन जातील.''
तेव्हा बादशाहा म्हणाला, ''वा! शाबास बिरबल, तू खरोखरच कमलीचा आहे.''
